टेंभुर्णी - कुंभारझरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा
अरुंद रस्ता देतोय मृत्यूला आवाहन .ऊस वाहतूक आणि वाढती रहदारी यामुळे अपघातामध्ये वाढ ..सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त.
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
टेंभुर्णी - कुंभारझरी रस्ता नेहमीच काही ना काही कारणाने नजरेत असतो. रस्त्याचे झालेले अरुंद काम,रस्त्यांच्या दुतर्फा बोकाळलेली झाडे, सतत जड वाहतूकीमुळे रस्त्याचे होत असलेले नुकसान या ना अशा कित्येक रस्त्या संदर्भात प्रश्न कायम जनतेसमोर आवाहन म्हणून उभे आहे,वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही परिस्थीती जैसे थेच..!
टेंभुर्णी - कुंभारझरी रस्ता हा मराठवाडा~विदर्भ जोड रस्ता अतिशय महत्त्वाचा असुन सुद्धा रस्त्यांच्या समस्या कायम निरुत्तर..! या रस्त्यावर दिवस रात्र वाहतूक सुरू असते, कुंभारझरी येथे बँक वॉटर पॉईंट असल्याने यासंदर्भातील सर्व अधिकारी कर्मचारी याच अरुंद रस्त्यावर,याचबरोबर या रस्त्यावर खानापूर,काळेगाव,कुंभारझरी, डोलखेडा,पापळ,कचनेरा, वरखेडा,सावरगाव म्हस्के, भातोडी, विदर्भातील ख. गव्हाण, सिनगांव जहागीर आदी गावांची वाहतूक ही नेहमीच कोंडी निर्माण करणारी असून सध्या परिसरातील ऊस तोड सुरू असून अरुंद रस्ता, ठीक ठिकाणी पडलेले गुडघा भर मोठ मोठे खड्डे,वाहतुकी साठी ट्रक व डबल ट्रॉली ट्रॅक्टर अतिशय मृत्यूला आवाहन ठरत आहे सोबतच रस्त्यांच्या दुतर्फा बोकाळलेली मोठ मोठी गर्दी करणारी झाडी आणि वाढलेले गवत अशा परिस्थितीमध्ये समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न लागता अपघात झालेले सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्वांनीच अगदी जवळून पाहिले आहे यामध्ये काहींनी आपल्या प्राणाची सुद्धा नाहक आव्हुती द्यावी लागली आहे, या संदर्भात याअगोदर विविध वृत्तपत्रांमध्ये वारंवार शासन दरबारी समस्या मांडली असता सर्व निष्फळ !
रस्त्यांच्या मधोमध असलेल्या मोठमोठ्या खड्डे जणुकाही येणाऱ्या जाणाऱ्या च्या जीवाशी खेळताना दिसत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष घालून रस्त्यांच्या दुतर्फा बोकाळलेली झाडे, मधोमध असलेली गुडघा भर खड्डे बुजुऊन होणारी वाहतूक कोंडी दूर करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

No comments:
Post a Comment