गोदावरी नदीवरील सुरेगाव नेवरगाव पुलाच्या भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न


*सुरेगाव नेवरगाव नदीवरील पूल हा औद्योगिक क्रांतीचा समृद्धीचा मार्गच होईल::*- नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री

दर्पण न्यूज:- नेवासा  तालुका प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे पाटील 

बऱ्याच वर्षांपासून प्रलंबितअसलेल्या नेवरगाव सुरेगाव गंगा या गोदावरी नदीवरील पुलाच्या मागणीची परिपूर्णता पूल मंजूर झाल्यामुळे  गोदावरी काठावरील सुरेगाव गंगा जैनपूर बेलपांढऱी बोरगाव उस्थळ खालसा गोधेगाव भालगाव परिसर आनंदित झाला आहेश्रीक्षेत्र नेवासा तालुक्यातील सुरेगाव ते गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाला महायुती सरकारने ₹५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हा विकसित होणारा मार्ग दोन भागांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरणार असून, दोन्ही जिल्ह्यांतील अध्यात्मिक तसेच औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी नवी दिशा देईल.श्रीक्षेत्र नेवासा येथील पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात येत असून, नदीकाठच्या घाटांचे सौंदर्यवर्धन आणि विकासासाठी जलसंपदा विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.

.             या गोदावरी नदीवरील पुलाचा भूमिपूजन समारंभ रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम, सुरेगाव रस्ता, नेवासा बुद्रुक येथे  संपन्न झालाआहे. सुरेगाव गंगा, बेलपांढरी ता.नेवासा ते नेऊरगाव, ता. गंगापूर येथील *गोदावरी नदीवर बांधण्यात येणाऱ्या सुरेगाव गंगा= नेवरगाव पुलाच्या भूमिपूजन समारंभ सद्गुरु आश्रमात गुरुवर्य बाबा  ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक,नेवासेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे आहे* रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०३:०० वाजता सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रम, सुरेगाव रस्ता, नेवासा बुद्रुक येथे राज्याचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र), मा. सौ. शालिनीताई विखे पाटील (मा. अध्यक्षा, जि.प.अहिल्यानगर) यांच्या शुभहस्ते, सद्गुरु आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक,नेवासेकर यांच्या अध्यक्षतेखाली व मा.खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, मा. आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील(नेवासा), मा. आमदार श्री. रमेश बोरणारे सर(वैजापूर–गंगापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आजी-माजी अधिकारी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाआहे. या समारंभ भूमिपूजनाच्या वेळी झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदरचा पूल हा माननीय खासदार बाळासाहेब पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी बरेच दिवस प्रयत्न केले होते त्याची पूर्तता माझ्या म्हणजे त्यांच्या मुलाकडून झाली यात मला सर्वस्व आनंद आहे या पुलामुळे युवकांचे नोकरीचे प्रश्न सुटणार आहे कारण भविष्यात या ठिकाणी गंगापूर तालुक्यातील हजारो एकर जमिनीवर आपल्याला औद्योगिक क्रांती घडवायची आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे व्यावसाय वाढवायचे आहेत त्यामुळे या पुलामुळे औद्योगिक क्रांतीचा समृद्धीचा मार्गच खुळा होणार आहे असे यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केले यावेळी वैजापूरचे आमदार श्री रमेश बोलणारे साहेब विठ्ठलराव लंघे पाटील खासदार भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांचीही भाषणा झाली प्रास्ताविक हभप उद्धव महाराज नेवासे कर यांनी केले या पुलामुळे नदीवर पूलच होणार असून नेवासे ते वैजापूर हा रस्ता दुरुस्त होणार आहे.कॉन्ट्रॅक्टर श्री.जगताप साहेबांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हा पुल म्हणजे माऊलीं ज्ञानोबारायांची सेवा म्हणून उत्कृष्टच होईल  असा विश्वासही व्यक्त केला. गुरुवर्य बाबा महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे या पुलाच्या कामात मोठे भरीव योगदान आहे वारकरी व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा पुल व्हावा असा शुभ संकल्प मनात आला. व त्यानुसार त्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला व खऱ्या अर्थाने यास मूर्त स्वरूप देण्याचे काम मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब व मा.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांचेही यामध्ये विशेष योगदान लाभले. याप्रसंगी पंचगंगा उद्योग समूहाचे चेअरमन श्री प्रभाकर काका शिंदे पाटील,श्री.वालतुरे सर,श्री काकासाहेब शिंदे,  श्री. सुनीलराव वाघ साहेब, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष श्री नितीन दिनकर, अब्दुल शेख अंकुशराव काळे, प्रदीप चिंधे सुरेगाव चे श्री काकासाहेब शिंदे पाटील संचालक ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, श्री. पाटील साहेब (सहा. कार्यकारी अभियंता, सा. बां. उपविभाग, नेवासा), तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. विवेक माळुंदे यांच्यासह वारकरी आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. जगताप तात्या (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर), सामाजिक बांधकाम उप विभागाचे अधिकारी, बाळासाहेब काळे बाळासाहेब पवार, प्राध्यापक रमेश शिंदे सर, नामदेव शिंदे सर,अण्णासाहेब एडवोकेट अण्णासाहेब आंबाडे पाटील, श्री नाथाभाऊ शिंदे पाटील बापूराव बोडके चेअरमन बगडी शिवाजीराव बोडके बगडी ह भ प ज्ञानेश्वर माऊली शिंदे सुरेगाव केदार शिंदे प्रशांत शिंदे किशोर शिंदे संतोष शिंदे कानिफनाथ कदम पदाधिकारी, नेवासा खुर्द, नेवासा फाटा, नेवासा बुद्रुक, सुरेगाव गंगा, बेलपांढरी, जैनपूर, बेलपिंपळगाव, भालगाव, उस्थळ खा, बहीरवाडी ता. नेवासा, नेऊरगाव, हैबतपूर,वाहेगाव, कानडगाव, बगडी, गाढे पिंपळगाव, ता.गंगापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यासह वारकरी आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment