मिरा राजेंद्र बोंडें यांचा राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 ने सन्मान

 


तालुका प्रतिनिधी  गजानन चव्हाण

डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने आयोजित राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 कार्यक्रम मलकापूर जि.बुलढाणा मध्ये येथील  भातृ मंडळ येथे आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने  विविध क्षेत्रातील  कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये शेलू बोंडे येथील रहिवासी असुन सध्या मुर्तिजापुर मध्ये राहतात, स्वच्छता अभियान मध्ये सक्रिय सहभाग, वृक्षारोपण, व इतर समाज उपयोगी उपक्रमा मध्ये सक्रिय सहभाग असुन या आपल्या अविरत सुरु असलेल्या समाजसेवा साठी त्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्राॅफी,मैडल, सन्मानपत्र या राष्ट्र गौरव ‌पुरस्कार 2025 ने गौरविण्यात आले.राष्ट्र गौरव पुरस्कार वितरण  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य व्ही. बी. कोलते इंजी. कॉ) कार्यक्रमाचे उद्घाटक ब्रह्मानंदजी जाधव मुख्य संपादक दैनिक महाभुमी, तर प्रमुख पाहुणे संजयजी काजळे सभापती कृ. उ.बा.समिती, धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, बंडूभाऊ चवरे उद्योजक, बाळासाहेब दामोदर उद्योजक राजू वैद्य विभागीय व्यवस्थापक, दिलीप आढाव  (प्राचार्य  ) डॉ. प्रदीप गायकी वा.नि.नांदुरा, अविनाश बोरले सर (प्राचार्य ) हे होते, या कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक ,राजकीय ,कला, वैद्यकीय,  उद्योजक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 देऊन करण्यात आला. यांना हा  पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे कुटुंब, नातेवाईक, मित्र मंडळी सहकारी मंडळी,शेलू बोंडे गावकरी, जि.प.शाळा शेलू बोंडे व सर्व स्तरावरून त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment