अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचा संताप, नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी - गणेश ठाकरे, लासलगाव
माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही भरपाई न मिळाल्याने अतिवृष्टी ग्रस्त पंचक्रोशीत शेतकऱ्यांची नाराजी वाढलीपंचक्रोशीत मे-जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही शासनाकडून अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने मिळालेली भरपाई तुटपुंजी आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांच्या माध्यमातून तहसीलदार निफाड यांना निवेदन देऊन तात्काळ भरपाई देण्याची मागणी केली आहे. अन्यथा कठोर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहेशेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पंचक्रोशीत अतिवृष्टीमुळे शेतजमिनीतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाच्या निर्देशानुसार पंचनामे करण्यात आले असूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांनी माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदनं देऊन मदतीची मागणी केली, मात्र तरीही कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. त्यामुळे पंचक्रोशीत शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
निफाड तालुक्यातील रुई, खेडलेझुंगे, कोळगाव, देवगाव, सारोळे थडी, नांदूर मध्यमेश्वर, गाजरवाडी, धारणगाव वीर, धारणगाव खडक, करंजी, ब्राह्मणवाडे, झुंगे बेट, तमासवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा लागली आहे.या निवेदनावर शिवाजी सुराशे, निवृत्ती गारे, गोपीनाथ ठुबे, धर्मराज घोटेकर, केदार घोटेकर, विजय गिते, योगेश घोटेकर, सचिन क्षीरसागर यांसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकऱ्यांची मागणी आहे की शासनाने तात्काळ न्याय देत भरपाई वाटप करावे, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment