खेडलेझुंगे रस्त्यावर अपघात नसून हत्याच ; दोघांच्या मृत्यू प्रकरणी चारचाकी चालकावर खुनाचा गुन्हा दाखल



*प्रतिनिधी = गणेश ठाकरे, लासलगाव 


दि.१ नोव्हे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खेडले ते ब्राम्हणवाडे रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात पती - पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत फिर्यादी विश्वनाथ एकनाथ दराडे, वय २९, व्यवसाय वकील, रा.खंबाळे ता. सिन्नर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.१ नोव्हें रोजी दुपारी जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून फिर्यादीचे मयत मोठे भाऊ व वहीणी यांच्यासोबत आरोपी

भाऊसाहेब साबळे याचा वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने आपल्या ताब्यातील इको चारचाकी क्र.एम.एच.१५ जे.एस.१९५४ द्वारे फिर्यादीच्या भावाच्या क्र.एम.एच.१५ बी वाय ५७२५ या मोटारसायकलचा डोंगरगावपासून पाठलाग करत खेडलेझुंगे ते ब्राम्हणवाडे रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावर जाणीवपूर्वक जोरदार धडक दिली. या धडकेत पती - पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी भाऊसाहेब सखाहरी साबळे, रा. डोंगरगाव, ता.निफाड याच्याविरुद्ध भा.न्या.सं.२०२३ चे कलम १०३(१), ३५२, ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


No comments:

Post a Comment