लोहपुरुषांची जयंती निमित्त लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड उत्साहात संपन्न




 *प्रतिनिधी- गणेश ठाकरे, लासलगाव*

 भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन, एकता दौड या उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी.भास्करराव शिंदे यांच्या नेतृत्वात दौडचे आयोजन करण्यात आले होते. या एकता दौडीची सुरुवात आज सकाळी ६.३० वाजता लासलगाव पोलीस ठाण्यात लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली व सांगता विंचूर रोडवरील स्वामी रिसॉर्ट येथे झाली.

     प्रसंगी विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी, डॉक्टर्स असोसिएशन, स्विमिंग ग्रुप, सायकलिंग ग्रुप, पत्रकार बांधव, पोलिस पाटील, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी वर्ग, शासकीय व निमशासकीय संस्था, शाळा - महाविद्यालये तसेच सामाजिक व धार्मिक मंडळांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित या दौडीचा उद्देश नागरिकांमध्ये एकता, बंधुता आणि देशभक्तीची भावना दृढ करणे हा होता.  या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सहभागी नागरिक, संस्था, माध्यम प्रतिनिधी व स्वयंसेवकांचे आणि लासलगांव पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी यांचे स.पो.नि.भास्करराव शिंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment