पी.एम.श्री . छञपती श्री .शिवाजी महाराज न.प. हायस्कुलच्या खेळाडू ची डिस्कस थ्रो ( थाळी फेक) स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ, व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विघमाने आयोजित अमरावती विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा .दि.२९ आॕक्टोंबर २०२५ पासुन पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडिअम यवतमाळ येथे सुरू असुन . यामध्ये स्थानिक पी.एम.श्री .छञपती श्री .शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कुल दे.राजा ची खेळाडू सुप्रिया शिंदे हिने १७ वर्षे वयोगटात थाळी फेक मध्ये उत्तम कामगिरी करत . अमरावती विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला असुन पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे . या नेञदिपक यशाबद्दल दे.राजा नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरूणजी मोकळ साहेब , शाळेचे प्राचार्य संजयजी देशमुख सर ,उप प्राचार्य आव्हाने सर, पर्यवेक्षक राजेश सपाटे सर. संजय मगर सर, व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी क्रीडा प्रशिक्षक अनिल दंदाले सर व विजयी खेळाडू चे शाळेच्या वतीने अभिनंदन केले

No comments:
Post a Comment