छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेल्या निंदनीय प्रकाराचा शिवसेनेकडून तीव्र निषेध — जबाबदार अधिकारी यांचे त्वरीत स्थलांतर करून कारवाईची मागणी



बाळासाहेब पवार प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील लीज संपुष्टात आलेला अतिक्रमणकारक पेट्रोल पंप तात्काळ हटविण्याची मागणी करून, एक सच्चा शिवभक्त रमेशभाऊ चव्हाण यांनी मागील अनेक दिवसांपासून कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सु डिग्री ठेवले होते.

परंतु दुर्दैवाने, उमरखेड प्रशासनाने त्यांच्या न्याय्य मागणीचा विचार न करता हुकूमशाही पद्धतीने व अधिकाराचा गैरवापर करुन पोलीस प्रशासनास हाताशी धरुन कार्यवाही केली आहे. हा प्रकार लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पेट्रोल पंपासारख्या ज्वलनशील पदार्थाच्या विक्री व साठवणुकीमुळे भविष्यात महाराजांच्या पवित्र पुतळ्यास धोका निर्माण होऊ शकतो, हे वास्तव प्रशासनाला समजत नाही का?

सदर पेट्रोल पंपामुळे आज महाराजांचा पुतळा नागरिकांच्या नजरेपासून झाकला जात आहे, ही प्रत्येक शिवभक्ताच्या मनाला वेदना देणारी बाब आहे. तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या गंभीर मुद्द्याकडे कानाडोळा करून एकनिष्ठ शिवभक्तावर कारवाई करणे हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे.

शिवसेना (शिंदे गट) उमरखेड यांच्या वतीने या हुकूमशाही व अन्याय्य कार्यवाहीचा तीव्र निषेध करीत असून, प्रशासनाने तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित आणि सुस्पष्ट दिसेल अशा स्थितीत आणावा, तसेच संबंधित पेट्रोल पंप हटविण्याची प्रक्रिया त्वरित सु डिग्री करावी, अशी मागणी करीत आहोत.

तसेच हुकूमशाही पद्धतीने शिवप्रेमींवर व सर्वसामान्य नागरीकांवर लाठीचार्ज करणा­या पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचे तात्काळ स्थलांतर करुन योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे, असे निवेदन शिवसेना (शिंदे गट) उमरखेड यांचे वतीने मा. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले आहे. तसेच संबंधीतांविरुद्ध त्वरीत कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शिवेसना उमरखेड शहर प्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव, महिला आघाडी शहरप्रमुख श्रीमती सपनाताई चौधरी, दामोदर इंगोले उपशहरप्रमुख, नितीन कलाने उपशहरप्रमुख, ॲड. अजय पाईकराव, बसवेश्वर क्षीरसागर उपशहरप्रमुख, राजुभाऊ गायकवाड प्रसिद्धी प्रमुख, अनिल नरवाडे निवडणुक निरीक्षक उमरखेड शहर, अतुल मैड माजी शहर प्रमुख, रविकांत रुडे जेष्ठ शिवसेना नेते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment