जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी



 प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव 

सरस्वती विद्यामंदिर लासलगाव शाळेमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर हा पंधरवडा साजराकेला जातो.या 'जनजाती गौरव पंधरवडा' म्हणून आदिवासी लोककला आणि परंपरांची माहिती जमविणे ,वारली पेंटिंग प्रदर्शन ,आदिवासी संस्कृती ,लोक जीवन प्रदर्शन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारली चित्रांचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी लोक कलेवर आधारित सांस्कृतिक नृत्य सादर केले.आदिवासी नृत्य व कलाविष्कार ,भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी ओळख आदी उपक्रम आयोजित केले.

कार्यक्रमाचे सुरुवात प्रतिमा पूजन करून  विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय नेत्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने  प्रणाली भातोडे, दुर्वा शिंदे, ईश्वरी ठोंबरे, ओम आघाव या विद्यार्थ्यांनी तर अध्यक्ष भाषणात भीमराव शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ जिरे यांनी केले.

No comments:

Post a Comment