पचखेडी पं.स. सर्कलच्या निवडणूक लढतीस विजय डोंगरे सज्ज...
सामाजिक कार्य, प्रामाणिक जनसंपर्क व मजबूत प्रतिमेवर उमेदवारी भक्कम...
स्वप्नील खानोरकर
पचखेडी : वेलतुर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत पचखेडी पंचायत समिती गणातील आगामी निवडणुकीत विजय डोंगरे यांच्या नावाने राजकीय वातावरणात चुरस निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याचा धागा कायम ठेवत त्यांनी जनतेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा ते ठाम विश्वास व्यक्त करतात. परिसरातील कार्यकर्तृत्व आणि लोकांप्रती निष्ठेमुळे त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.
विजय डोंगरे हे उच्चशिक्षित, अभ्यासू आणि संतुलित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. पंधरा वर्षांपासून बँकेच्या डेली आणि आरडी कलेक्शनच्या माध्यमातून सर्कलमधील अनेक गावांशी त्यांचा सतत संपर्क राहिला आहे. या दैनंदिन संवादामुळे नागरिकांशी त्यांची नाळ घट्ट जुळली असून विश्वासार्ह प्रतिमा निर्माण झाली आहे. शांत स्वभाव, कामाची वृत्ती आणि प्रामाणिकपणा हे त्यांच्या उमेदवारीचे मोठे बळ आहे.
बहुतेक गावांमधील जुना व घट्ट जनसंपर्क असल्याने त्यांना सर्वत्र लोकप्रियता मिळत आहे. राजकारणात पडद्यामागून सातत्याने काम केल्यामुळे महिला, शेतकरी, दिव्यांग आणि युवक वर्गाकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण या मूलभूत प्रश्नांसह ग्रामीण भागातील अनेक क्षेत्रांत ठोस बदल घडवणे हेच माझे ध्येय असल्याचे डोंगरे म्हणाले.
कामाप्रती निष्ठा, मनमिळावू स्वभाव आणि लोकांशी जोडून राहण्याची वृत्ती यामुळे सर्कलमध्ये त्यांच्यावरील विश्वास वाढत आहे. सामाजिक कार्याची छाप आणि जनता-केंद्री दृष्टिकोन पाहता विजय डोंगरे हे या निवडणुकीतील बलाढ्य उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पचखेडी गटातील वाढत्या पाठिंब्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत सर्कलमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय तापमान वाढत असून आगामी निवडणुकीत चुरसपूर्ण आणि लक्षवेधी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No comments:
Post a Comment