बावीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी केला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम साजरा.
पत्रकार:- मोहन जाधव @ गाव प्रतिनिधी
चास (नळी):- शनिवार दिनांक २५/१०/२०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी येथे माजी विद्यार्थी मेळावा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.आपले माजी विद्यार्थी अनिल चांदगुडे ,राजकिरण गाडे,अनिल गाडे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी शाळेचे सर्वं शिक्षक वृंद यांनी अतिशय नियोजनबद्ध मेळाव्याचे आयोजन केले. मेहेरखांब सर यांनी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी अनिल गायकवाड, रवींद्र जाधव, निवृत्ती चांदगुडे,पल्लवी चांदगुडे पल्लवी ना. चांदगुडे,गणेश गाडे,संतोष सरडे,अमोल धेनक,सोपान धेनक,साधना चांदगुडे, सारिका चांदगुडे, सविता आचार्य, प्रीती रोठे, दिपक खताळे ,योगेश तांगतोडे,नवनाथ उल्हारे, असे माजी विद्यार्थी हजर होते. प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी कसे झालो त्याचप्रमाणे आम्हाला शिक्षकांनी कसे घडवले. आमचा विकास कसा होत गेला,आम्ही प्रगतीपथावर कसे गेलो.यांचे अनुभव कथन केले त्याचप्रमाणे आपली जिल्हा परिषद शाळा कशी श्रेष्ठ आहे व त्यातून विद्यार्थी कसे घडतात. विद्यार्थ्यांच्या जीवनाचा मजबूत पाया जिल्हा परिषद शाळेतच घातला जातो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले जाते. जिल्हा परिषद शाळेतून गुणवंत विद्यार्थी तयार होतात यांचे मूर्तीमंत उदाहरणे देऊन उच्च पदावर असणारे माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या विकासात आर्थिक दृष्ट्या आपला हातभार कसा लागेल. शाळेची उन्नती, प्रगती कशी होईल,भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना कशा मिळतील याकडे सर्व माजी विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. शाळेच्या विकास कामात आमचा मोलाचा सहभाग असेल असे माजी विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. शेवटी मेहेरखांब सरांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
.jpg)
No comments:
Post a Comment