छत्रपती शाहू ज्यु.कॉलेज ऑफ सायन्स घाटबोरीची विद्यार्थीनी प्रतिक्षा मुळे हिची कब्बडी या खेळासाठी राज्यस्तरावर निवड
(प्रतिनिधी-रामेश्वर तोंडे मेहकर)
घाटबोरी ः येथील छत्रपती शाहू महाराज ज्यु.कॉलेज ऑफ सायन्सची विद्यार्थीनी कु.प्रतिक्षा मुळे हिची विदर्भ राज्य अजिंक्य पद कब्बडी स्पर्धा तुमसर जि.भंडारा येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. या स्पर्धेकरीता बुलडाणा जिल्हा कब्बडी संघाची निवड चाचणी २६ ऑक्टोबर रोजी श्री शिवाजी व्यायाम मंदिर खामगाव येथे आयोजीत करण्यात आली होती. या ठिकाणी या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष गोकुलसिंह सानंदा, विदर्भ कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्रसिंह ठाकूर, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, नगराध्यक्षा अलकादेवी सानंदा इत्यादींच्या उपस्थितीत या स्पर्धेकरीता सिनिअर खेळाडूंची पुरुष व महिला गटाकरीता निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील तेराही तालुक्यातून विद्यार्थी, विद्यार्थीनी याठिकाणी उपस्थित होत्या. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून निवडलेल्या संघामध्ये छत्रपती शाहू महाराज ज्यु.कॉलेज ऑफ सायन्स घाटबोरी या कॉलेजची इयत्ता ११ वी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी कु.प्रतिक्षा गणेश मुळे या विद्यार्थीनीची जिल्ह्यातून जाणार्या सात खेळाडूंच्या संघामध्ये निवड झाली असून, कु.प्रतिक्षा तुमसर येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये छत्रपती शाहू महाराज ज्यु.कॉलेज ऑफ सायन्स घाटबोरी याच्या भव्य क्रिडांगणावर पार पडलेल्या शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाच्या तालुकास्तरीय तीन दिवसीय स्पर्धांमध्ये या शाळेच्या व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती. सर्वत्र विद्यार्थी, शिक्षक तथा प्रतिक्षाचे प्रशिक्षक व पालक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment