सावंगी गावात ‘ग्रामगौरव’ उपक्रमातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन


----------------------------

गाव, संस्कृती आणि समाज यांना जोडणारा सांस्कृतिक सोहळा म्हणजे ग्रामगौरव २०२५ - ठाणेदार प्रशांत मिसाळे यांचे प्रतिपादन.


स्वप्नील खानोरकर 


पचखेडी :–सांस्कृतिक वारसा जपण्याचा आणि समाजात प्रबोधन घडवण्याचा सुंदर संगम सावंगी ग्रामातील ‘ग्रामगौरव’ या उपक्रमातून पाहायला मिळाला. “मनोरंजनातून प्रबोधन” ही मध्यवर्ती भूमिका स्वीकारत, ग्रामस्थांनी उत्साहात ग्रामीण परंपरेचा उत्सव साजरा केला.कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक शोभायात्रेने झाली. गावातील नागरिक, युवक आणि विद्यार्थी यांनी पारंपरिक पोशाखांत सहभागी होत, प्रेम, एकता आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला. या शोभायात्रेने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.उद्घाटन प्रसंगी वेलतूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत मिसाळे, सरपंच सौ. सुरेखाताई कवडू राऊत, पोलीस पाटील अभय फेंडर, तसेच भोजराजजी चारमोडे, गोविंदराव फेंडर, ईश्वर बांडेबूचे, सुखदेव मेश्राम, योगेश फेंडर, कुनिता खेकारे, गुणवंता लांजेवार, प्रदीप शेंडे, चंदन मेश्राम, पंचम रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवसभर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर मोरेश्वर निकोडे यांच्या कलंगी दंडार पार्टी फेगड तर्फे लोकनृत्य, पारंपरिक खेळ आणि लोकगीते सादर करण्यात आली. या सत्रातून ग्रामीण जीवनातील आनंद, संस्कार आणि एकतेचा संदेश प्रकट झाला.रात्रीच्या सत्रात ह.भ.प. गणेश महाराज शिंदे व ह.भ.प. शंकर महाराज कावळे यांच्या भारूड कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले, तसेच व्यसनमुक्ती, तरुण जागृती, संघटन आणि संस्कृती जपण्याचा संदेश दिला.या भारूडाला तबला — गजानन चनोडे, ऑर्गन — उमाजी शिवणकर आणि हार्मोनियम — प्रशांत चनोडे यांनी साथ दिली.गाव, संस्कृती आणि समाज यांना जोडणारा सांस्कृतिक सोहळा म्हणजे ग्रामगौरव २०२५ असून 

ग्रामगौरव उपक्रमातून सावंगी ग्रामाने केवळ सांस्कृतिक नव्हे तर सामाजिक एकतेचा दीप प्रज्वलित केला आहे. असे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांनी आपल्या मनोगतात म्हटले.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल फेंडर, किशोर बांडेबूचे, सचिन चारमोडे, साहिल फेंडर, हर्षल मेश्राम, कवडू रेहपाडे, नोकेश्वर फेंडर, गुंडेराव मेश्राम, शेखर मेश्राम, अजय सोनटक्के, प्रकाश फेंडर, अमोल मेश्राम, मोहन रोहनकर, अभिषेक खोईया, आर्यन खेकारे, बादल टाले आदींनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment