राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत संजना हिवरकर सुवर्ण पदकाची मानकरी

 



तालुका प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर

  भुसावळ : वाराणसी,  उत्तर प्रदेश येथे २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा  प्रथम क्रमांक आला असून यामध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या स्पर्धकांमध्ये तरोडा (मुक्ताईनगर) येथील संजना गजानन हिवरकर या विद्यार्थिनीचा समावेश आहे. सध्या हल्ली संजना  ठाणे येथे स्थित आहे. या स्पर्धेत संपूर्ण  भारतातून १६ राज्यांतून  ५०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.  स्पर्धेत पहिला क्रमांक महाराष्ट्राचा ,दुसरा उत्तर प्रदेश, तर तिसरा क्रमांक छातीसगढ या राज्याने मिळवला. स्पर्धेत पिंपरी चिंचवड (पुणे) येथील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून अनेक पदके पटकावले. त्यामध्ये असिफ शेख याने  सुवर्ण पदक पटकावत उत्कृष्ट खेळाडू ठरळा.संजना हिवरकर( सुवर्ण पदक ), इसक्की तेवर (सुवर्ण पदक), सुरज भांडे (सुवर्ण पदक ) ,कृष्ण दिवेकर (सुवर्ण पदक), अजित जैस्वाल ( सुवर्ण पदक ), अतिक शेख (सुवर्ण पदक ), हेमंत सिंग (रौप्य पदक)  अशी पदके पटकावत  महाराष्ट्र संघाचा प्रथम क्रमांक आणला. स्पर्धेचे  प्रमुख अतिथी (अध्यक्ष, राष्ट्रीय थाई बॉक्सिंग असोशिएशन) पी वाय आत्तार ,मंत्री दयाशंकर यांच्या हस्ते खेळाडूना बक्षिश  वितरण करण्यात आले. स्पर्धेवेळी नाझीं शेख, अरुणा हिवरकर, प्रियांका अचमट्टी उपस्थित होते. तर महाराष्ट्र  थाई बॉक्सिंग असोशिएशनचे कार्याध्यक्ष विशाल माळी , सचिव अजय खेडगरकर,   महाराष्ट्र  थाई बॉक्सिंग असोशिएशनचे खजिनदार गणेश मांढरे यांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment