आयुध निर्माणी वरणगाव येथे राजपूत समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव



 तालुका प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर

 भुसावळ :आयुध निर्माणी वरणगाव  येथे नुकताच रविवार १४ सप्टेंबर रोजी राजपूत समाज उन्नती मंडळाच्या वतीने  राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा उत्साहात आणि सन्मानात पार पडला. याप्रसंगी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख  मान्यवरांनी विद्यार्थी व पालकांच्या गुणवत्तेचे कौतुक केले व त्यांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त सत्र न्यायधीश करुणाताई राजपूत, स्टेट  बँक ऑफ इंडियाचे मनेजर ऋषिकेश पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन  सर (शिवसेना शिंदे गट), भरतसिंह आप्पा पाटील, दिलीपसिंह पाटील कोमलसिंह राजपूत, दामोदरसिंह राजपूत, विलाससिंह पाटील, संदीपसिंह राणा, सारिका राजपूत ,विक्रमसिंह राजपूत, प्रा. संजयसिंह राजपूत आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

 या प्रसंगी करुणाताई राजपूत यांनी अध्यक्षीय भाषणात राजपूत समाजाच्या ऐतिहासिक परंपरा, शौर्य व शिक्षणातील प्रगती यावर भर देत विद्यार्थ्यांना देशहितासाठी प्रेरित होण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, “विद्यार्थ्यांनी फक्त शैक्षणिक यश नव्हे तर समाजासाठी आदर्श नागरिक होण्याचे ध्येय ठेवावे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यपालसिंह राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन एस.सी.पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सी.एल.पाटील, सचिव प्रविण पाटील, जे.के. पाटील सर, पंकज जाधव,बाबूलाल पाटील, स्वप्नील राजपूत,दिपक पाटील,चंचल सिंग राजपूत आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.


No comments:

Post a Comment