बांधावर झाडे लावण्याचा कडेपूर पॅटर्न उत्कृष्ट: जिल्हाधिकारी अशोक काकडे
कडेपूर (ता. कडेगाव, जि. सांगली)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आणि राष्ट्रनेते पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जयंतीनिमित्त दि. 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित “सेवा पंधरवडा” निमित्त कडेपूर ग्रामपंचायतच्या वतीने दिनांक 18 सप्टेंबर रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले.या कार्यक्रमात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत श्री अधिक बाबुराव यादव यांच्या शेतात जलतरा खुदाईचे काम तसेच ऊसबांधावर नारळ रोपांची लागवड या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
मुख्य मान्यवरांचे शुभहस्ते कार्यारंभ
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी श्री अशोकजी काकडे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये –
• मा. सागर गवते (उपवनरक्षक अधिकारी) • मा. श्रीमती विजया यादव (उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी विभाग)• मा. शिवाजीराव जगताप (प्रांत अधिकारी, पलूस-कडेगाव) • मा. प्रशांत वरुडे (सामाजिक वनाधिकारी) • मा. अजित शेलार (तहसीलदार, कडेगाव • श्री लांगे (जिल्हा प्रशासन अधिकारी, सांगली)• मा. प्रशांत राऊत (गटविकास अधिकारी, पंचायत समिती कडेगाव) • मा. संभाजी पतकुरे (तालुका कृषी अधिकारी) • मा. अतुल बामणे (सहाय्यक कृषी अधिकारी) • श्री मोहन चव्हाण व श्री सिद्धनाथ काळे (कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती कडेगाव) • श्री सुहास बोरगावे (जिल्हा कार्यालय प्रतिनिधी) • मा. मेहमूद पटेल (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) • मा. राजू कुत्ते व मा. कृष्णा गोसावी (तांत्रिक अधिकारी, रोजगार हमी विभाग)• सौ. सुनिता कदम (तहसील कार्यालय, कडेगाव)• श्री मोहन लाड (क्लार्क, रोजगार हमी विभाग)• श्री जारवाल (ग्राम महसूल अधिकारी) • सौ. शुभांगी खांबे (संगणक चालक, रोजगार हमी विभाग)हे मान्यवर विशेष उपस्थित होते.
ग्रामपंचायत प्रतिनिधी
या कार्यक्रमाला माननीय श्री सतीश भाऊ देशमुख (लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत कडेपूर), उपसरपंच श्री वैभव यादव, ग्रामपंचायत अधिकारी श्री शकील मुलाणी तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री अनिल यादव (माजी उपसरपंच, कडेपूर) यांनी केले.
गावातील मान्यवरांची उपस्थिती
श्री धन्यकुमार यादव देशमुख (चेअरमन, सर्व सेवा सोसायटी कडेपूर), श्री शंकर यादव (चेअरमन, आधार नागरी पतसंस्था कडेपूर), ज्येष्ठ नेते पंडित नाना यादव, श्री अशोक तात्या यादव, डॉ. राजेंद्र यादव, श्री प्रकाश यादव बागायतदार, श्री विश्वजीत महावीर यादव देशमुख, श्री नेताजी यादव, श्री लालासाहेब यादव, श्री. अधिकराव यादव, श्री अमोल यादव यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे महत्त्व
सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जलसंवर्धन व वृक्षारोपणासारखे उपक्रम राबविल्याने पर्यावरणपूरक ग्रामविकासाला चालना मिळणार असून, गावाच्या शाश्वत प्रगतीस नवी दिशा मिळणार आहे, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment