कडेपूर ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे ग्रामस्तरीय उद्घाटन समारंभ उत्साहात
कडेपूर (वार्ताहर) :मुकुंद सुकटे
आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय उद्घाटन समारंभ कडेपूर ग्रामपंचायतीतर्फे राजलक्ष्मी मंगल कार्यालय, कडेपूर येथे पार पडला.या कार्यक्रमास गटविकास अधिकारी मा. राऊत साहेब (पंचायत समिती कडेगाव), सौ. आशा चौगुले (तालुका आरोग्य अधिकारी, कडेगाव), डॉ. साळुंखे (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वांगी), सौ. नेहा कांबळे (अंगणवाडी पर्यवेक्षिका), सौ. अंजना यादव (मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा कडेपूर) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.तसेच ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व सदस्य, बचत गटाचे सीआरपी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, गावातील सर्व बचत गटाचे प्रतिनिधी, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, व्यापारी संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, गावातील सर्व भजनी मंडळ यांचे पदाधिकारी, तसेच महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य कार्यक्रमाचे ठळक मुद्दे
• मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
• पोषण आहार माह अंतर्गत अंगणवाडीच्या वतीने पोषण पाककला प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच मा. सतीश भाऊ देशमुख यांच्या शुभहस्ते झाले.
• प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कडेपूर यांच्यातर्फे महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
• ग्रामपंचायत कडेपूरकडून गावातील घरावर सौरऊर्जा बसवणाऱ्या महिला कुटुंब प्रमुखांना प्रत्येकी रु. 5000/- चे अनुदान प्रदान करण्यात आले. या धनादेशांचे वितरण गटविकास अधिकारी मा. राऊत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
घरगुती सौरऊर्जा अनुदान लाभार्थी यादी
१) सौ. वैशाली पृथ्वीराज यादव
२) सौ. अनिता प्रदीप यादव
३) सौ. सुषमा सचिन यादव
या कार्यक्रमामुळे ग्रामपंचायत कडेपूरने डिजिटल, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक उपक्रमांची बांधिलकी अधोरेखित केली.
No comments:
Post a Comment