ग्रामविकासासाठी नेवरी ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ
प्रतिनिधी, मुकुंद सुकटे
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणा-या मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाची सुरवात जि.प. शाळेची,प्रभातफेरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे समवेत गावातून काढणेत आली.
तसेच ग्रामपंचायतीचे सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले ग्रामसभा सुरू होणेपुर्वी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज तसेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभियानाचा शुभारंभ करणेत आला.
मान्यवरांचे व सर्व ग्रामस्थांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी श्री. संदीप कुंभार यांनी करून, मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान राबविणे बाबतचा शासन निर्णय तसेच अभियानाचे मुख्य घटक विषया बाबत आणि अभियान कालावधी दि.१७सप्टेंबर, २०२५ ते दि.३१ डिसेंबर, २०२५ पर्यंतच्या मोहीम कालावधीतील ग्रामपंचायतीसाठी दिलेली प्रश्नावलीचे सविस्तर विश्लेषण करून माहिती दिली. तसेच मंडळ अधिकारी सौ. कविता चव्हाण मॅडम यांनी महसूल सेवा पंधरावडा अंतर्गत तीन टप्यामध्ये करणेत येणा-या कामांची माहिती दिली.
तसेच संपर्क अधिकारी तथा विस्तार कृषी अधिकारी श्री मोहन चव्हाण साहेब, यांनी तालूका स्तरीय, जिल्हा स्तरीय, विभाग स्तरीय, राज्य स्तरीय पुरस्काराच्या माध्यमातून मिळणा-या पुरस्कार रक्कमे बाबत माहिती दिली. तदनंतर अभियाना यशस्वीरित्या राबविणेसाठी ग्रामस्तरीय समितीची स्थापणा करणेत आली. यावेळी माऊली रोपवाटिकेचे मालक श्री. दिपक भाऊ महाडीक व श्री मुरलीधर आप्पा महाडीक यांनी अभियानात वृक्ष लागवडीसाठी मोफत वृक्ष देणेचा आदर्श संकल्प केला आहे.
तसेच श्री. इंद्रजीत साळुंखे यांनी या अभियानासाठी वीस हजार रुपये ची लोकवर्णणी देणेचे घोषीत केले. तसेच मा. सौ. सरपंच प्रमिला दत्तात्रय साळुंखे यांनी अभियान कालावधीत दोन मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतलेस त्या कुटुंबास र.रु. ५०००/-(पाच हजार देणेची घोषणा करून एक नाविन्यपुर्ण उपक्रमाची घोषणा करणेत आली. त्याच बरोबर सी.आर.पी श्रीमती मृणाली महाडीक मॅडम, यांनी लोकसंख्येचा विचार करता प्रती व्यक्ती रु.रु.२००/- प्रमाणे लोकवर्गणी जमा करणे बाबत आवाहन केले.
तसेच गावातील सर्व बचत गटाच्या माध्यमातून अभियानास सर्वतोपरी सहकार्य करणेचे मान्य केले. तसेच सरपंच सौ. प्रमिला साळुंखे, उपसरपंच श्री. हर्षद ननवरे यांनी अभियान राबविणेसाठी सभेस माहिती दिली. सदरच्या सभेस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, मंडळ अधिकारी सौ. कविता चव्हाण मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी श्री. संदीप कुंभार, संपर्क अधिकारी चव्हाण, माजी. पंचायत समिती सदस्य, माजी. सरपंच, माजी सैनिक, सर्व मुख्याध्यापक, सी.आर.पी. मॅडम, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, पोलीस पाटील, सर्व पत्रकार, सर्व संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, कृषी सहाय्यक, बचत गटाच्या सदस्या, व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रा.प. सदस्य, श्री. अँड, प्रतिकेत जाधव यांनी कार्यक्रमाचा समारोप करत उपस्थितांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment