स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक ताकतीने लढवणार : मा सांगली जिल्हा परिषदेचे मा अध्यक्ष संग्राम देशमुख




भाजपाच्या राज्य व जिल्हा कार्यकारणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार संपन्न‪

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा संग्राम सिंह देशमुख यांनी भाजपाच्या राज्य व जिल्हा कार्यकारणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून आपण पक्षाचे पदाधिकारी आहोत विधानसभेला पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेवटच्या घटकातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यामुळेच आपल्याला लाखापेक्षा जास्त मते मिळाली असून यापुढे सर्व निवडणुका ताकतीने लढवणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा संग्राम सिंह देशमुख यांनी केले 

 ते कडेपूर येथे भाजपाच्या राज्य व जिल्हा कार्यकारणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होतेसर्वसामान्य जनता ही काम करणाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे असते हे आपण कडेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी पाहिले आहे त्यामुळे तळागाळापर्यंत संघटना बांधणीकडे लक्ष द्या भाजपा हा पक्ष काम करणाऱ्याला संधी देत असतो 

 त्यामुळे पक्षाची ध्येयधोरणे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा पक्ष योग्य वेळी संधी देईल, येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला भरघोस असे यश प्राप्त करायचे असल्याने आपण ताकतीने कामाला लागण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा संग्राम सिंह देशमुख यांनी दिले

 यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय परिषद सदस्य पदी मा राजाराम भाऊ गरुड सांगली जिल्हा भाजपा सरचिटणीस पदी सौ मंदाताई करांडे शाळगाव कडेगाव तालुका ग्रामीण अध्यक्षपदी मा विकास सूर्यवंशी खेराडे वांगी सांगली जिल्हा भाजपा कार्यकारणी सदस्यपदी मा, दत्तात्रेय उतळे धनगाव ता,पलूस मा विजय पाटील नागठाणे ता पलूस श्रीमती आशाताई मोहिते माळवाडी ता पलूस अशोक साळुंखे हिंगणगाव खुर्द ता, कडेगाव रविंद्रकुमार कांबळे वांगी ता कडेगाव मा प्रकाश गायकवाड कडेगाव सौ पपीता ताई सुतार मोहिते वडगाव ता कडेगाव सौ विद्याताई खाडे यांचे वतीने मा विजय भाऊ खाडे यांचा सत्कार करणेत आलाकार्यक्रमाचे आभार कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मा धनंजय देशमुख यांनी मानले

या वेळी मा. जयदीप भाऊ देशमुख, ग्रीन पॉवर शुगर्स लि.गोपूज कारखान्याचे चेअरमन सौ. अपर्णा ताई देशमुख, कडेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष मा. धनंजय भैय्या देशमुख, उपनगराध्यक्ष पै. मा. अमोल भाऊ डांगे, मा. प्रतापराव ऊर्फ बबन दादा यादव, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा. रोहित नाना पाटील, मा. संग्राम तात्या यादव, मा. जयराज देशमुख, उद्योजक मा. प्रकाश काका नलवडे, मा. दाजीराम भाऊ मोहिते, अमोल मोहिते, सुहास चोबे, सतीश आबा यादव, अमर यादव, विशाल हात्तीकर, सौरभ पवार, अक्षय करांडे, राकेश जरग, सूर्याजी बाबा यादव, सतीश बापू यादव, हिंदुराव नाना यादव, विकास पवार,अजित भैय्या यादव, विकास तात्या यादव, संतोष भाई यादव, संग्राम पडळकर, संभाजी पवार, यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment