ग्रामीण भागात ई -पीक पाहणीत नेटवर्कचा खोडा...



जितेंद्र गोंडाणे  तालुका प्रतिनिधी 

              कुही - राज्यभर सुरु असलेल्या ई पीक पाहणी प्रकल्पला ग्रामीण भागात नेटवर्कचा अडसर आणि शेतकऱ्यांना ऍप  वापरणीत अडचण यामुळे मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाऊन पिकांची लोकेशनसह फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे मात्र मोबाईल नेटवर्क आणि ऍपचे वापरण्याचे ज्ञान नसल्यामुळे नोंदणी प्रकियेत अडथळे येत आहेत. यासाठी संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

               ई-पीक पाहणीकरीता 14 सप्टेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती मात्र राज्यात झालेली अतिवृष्टी आणि दुबार पेरणी आदी कारणांमुळे शेतकरी ई-पीक पाहणी करु शकले नाही. शेतकरी पीक नोंदणी पासून वंचित राहू नये, शेतकरी स्तरावरुन पुन्हा 6 दिवसांची मुदतवाढ म्हणजे 20 सप्टेंबर ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी 21 सप्टेंबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत सहाय्यक स्तरावरुन पूर्ण करता येणार आहे.

                शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक नोंदणी करणे आवश्यक आहे.नैसर्गीक आपत्तीची शासन मदत मिळविण्यासाठी यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक नोंद आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन महसूल तथा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment