जिजामाता शिक्षण संस्थेच्या वतीने आर्दश शिक्षकांना सन्मानीत.
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जिजाऊ शैक्षणिक संकुल टेंभुर्णी मध्ये जिजामाता शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा तसेच स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद चे प्राचार्य डॉ. आर. टी. देशमुख सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या संस्थाध्यक्षा डॉ. सुरेखाताई संजयजी लहाने , सचिव श्री संजयजी लहाने सर, सहसचिव सुयश भैय्या लहाने यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुयश भैया लहाने यांनी केले.
यावेळी शिक्षण संस्थेचे प्रामाणिकपणे काम केल्यामुळे संस्थेच्या शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये डॉ. पिंपळे सर, वर्षा देशमुख , सौ. वानखेडे , श्री नदीम सर आदीं शिक्षकांना आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. आर. टी. देशमुख सर यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक कसा असावा व शिक्षकाची जबाबदारी काय आहे . आणि विद्यार्थी घडवण्यासाठी यांनी कोणते कार्य केले पाहिजे , विद्यार्थी घडवण्यासाठी तन- मनाने काम केले पाहिजे.
यावेळी मंचावर उपस्थित पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मुकेश भारद्वाज व सहपत्रकार बालाजी शेवाळे , प्राचार्य जलील , प्राचार्य एस आर. फलटणकर , एम.एन.पठाण , प्राचार्य लोखंडे , प्राचार्य पंजाब लहाने , प्राचार्य के. एस. टाले , प्राचार्य देशमाने , फार्मसीचे डॉ. व्हि.आर. पवार , वायाळ सर, शिंपी सर, एस. के.रहीम सर, आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. पी.पी. बनकर मॅडम व प्रा. के.पी.परिहार मॅडम या दोघींनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्री. सखाराम भालके सर यांनी केले.
No comments:
Post a Comment