श्रीगोंद्यात पाचपुतेभोवतीच्या गर्दीचा धसका…
श्रीगोंदा प्रतिनिधी:- प्रा. अशोक राहिंज
गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तालुक्यातील सर्वच विरोधक आता पुढच्या निवडणुकीच्या तयारीत आहेत. तालुक्यात कुठलीही सत्ता आपल्या हाती नसल्या मुळे सर्व विरोधक सत्तेत सहभागी झाले आहेत.सत्तेच्या जोरावर निवडणुका लढवण्याचा त्यांचा हा केवीलवाणा प्रयत्न सुरू आहे.सगळे विरोधकांनी एकत्र येण्यात धन्यता मानली असली तरी, पाचपुतेंकडे होणारी गर्दी भावी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अडचण वाढविणारी आहे. गेल्या विधानसभेला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र लढले, गेल्या चाळीस वर्षीपासून तालुक्याच्या राजकारणात संक्रिय असणाऱ्या या विरोधकांनी एक अपवाद वगळता ते पाचपुते ना पराभूत करू शकले नाहीत
दांडगा लोकसंपर्क ही पाचपुतेंची जमेची बाजू आहे. विधानसभेला राहुल जगताप यांच्यासह शिवसेना उबाटा गटाच्या नेत्या अनुराधा नागवडे यांच्यासह अन्य छोटे मोठे पक्ष व सर्व विरोधक विरोधात होते. मात्र,सगळ्यांना धोबीपछाड करत आमदारकीची माळ विक्रम सिंह पाचपुते यांच्या गळ्यात पडली आणि त्यांनी त्याचे सोने केले.
तालुक्यातील सर्वच नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी आत्ताच सुरू केली आहे. एवढे विरोधक असताना सामान्यांच्या जनसंपर्काच्या जोरावर पाचपुते आघाडीवर आहेत.कामे घेऊन येणाऱ्यांची त्यांच्याकडे होणारी गर्दी कारखानदार असणाऱ्या व निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या सर्व विरोधकांच्या अडचणी वाढविणारी आहे. शहरात भाजप कार्यालयात लोकांची कामासाठी होणारी गर्दी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
आमदार बबनराव पाचपुते यांचे कार्यालय अनेक वर्षे लोकांसाठी आधार आहे. सरकारी कार्यालयांतील कामे तेथून होत आहेत. शिवाय आमदार विक्रमसिंह पाचपुते महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार घेत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या असणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात मार्गी लागत आहेत. या माध्यमातून आमदार पाचपुतेंना राज्यात सत्ता असल्याने सरकारी यंत्रणेकडून कामे करून घेणे सोयीचे होते.
कामे करून घेणारा नेता जवळचा
तालुक्यातील पाचपुते विरोधक लोकांच्या संपर्कात नाहीत, ते फक्त निवडणुका जवळ आल्याकी लोकांमध्ये मिसळतात त्या उलट पाचपुते घराणे सहजासहजी उपलब्ध होणारे व थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामे करून देणारे नेते म्हणून लोकांना जवळचे वाटतात. तालुका पातळीवर काम करणारे बहुतेक नेते शहराच्या बाहेर राहतात. सरकारी कार्यालये शहरात असल्याने व स्वतःचे कार्यालय असल्याने सध्या पाचपुतेंकडे सर्वसामान्यांची गदर्दी वाढली आहे. त्यामुळे पुढच्या निवडणूकही ते याच मुद्द्यावर लढू शकतात, असा अंदाज आहे.
No comments:
Post a Comment