कुही तालुक्यात मनसेची कार्यकारिणी सभा संपन्न



नव्या पदाधिकाऱ्यांची निवड, ग्रामीण भागात पक्षबांधणीला गती..

कुही : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) कार्यकारिणी सभा रविवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सोनेगाव पुनर्वसन येथे पार पडली. जिल्हाध्यक्ष शेखरभाऊ दुंडे (उमरेड व रामटेक विधानसभा क्षेत्र) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.या बैठकीत मारुती अंबोने (उपजिल्हाध्यक्ष), शिवपाल फेडर (तालुका अध्यक्ष), विजय कस्तुरे (सचिव), संजय रामटेके (तालुका संघटक), मनोज बागडकर (शाखा अध्यक्ष), राकेश दुधपचारे (शाखा उपाध्यक्ष), अभिषेक खोईया (शाखा अध्यक्ष, सावंगी), मंगेश मेश्राम (शाखाध्यक्ष, सोनेगाव), आशिष वावरे (शाखा अध्यक्ष, राजोली), नथू कडूकार, सचिन मुळे, सुधाकर खांबाळकर (शाखाध्यक्ष, पचखेडी) आदी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष शेखरभाऊ दुंडे यांनी सांगितले की मनसे ही फक्त शहरी संघटना नाही, तर ग्रामीण भागातसुद्धा पाय रोवण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षणातील अडचणी आणि पायाभूत सुविधांसाठी मनसे थेट लोकांसोबत उभी राहील. गावोगावी पक्षाची संघटना उभी राहिली, तर जनतेला खरा पर्याय मिळेल.पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेते. ग्रामीण पातळीवरील पदनियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि स्थानिक पातळीवर मजबूत संघटना उभारण्याचा पाया घातला जातो.सभेच्या अखेरीस जिल्हाध्यक्ष दुंडे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव सज्ज आहे. अन्याय सहन केला जाणार नाही. गरज पडली तर मनसे रस्त्यावर उतरून लढेल. गावकऱ्यांच्या हक्कासाठी कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणे हीच आमची खरी ताकद आहे.

No comments:

Post a Comment