वेलतूरचा सागर चाचेरकर सेट परीक्षा उत्तीर्ण
स्वप्नील खानोरकर
मांढळ - येथून जवळ असलेल्या वेलतूर येथील सागर गोविंदा चाचेरकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ आयोजित राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) गणित विषयात उत्तीर्ण केली. सागर हा श्री. लेमदेव पाटील महाविद्यालय मांढळचा माजी विद्यार्थी असून येथेच गणित विषयाचे अध्ययन व अध्यापन करीत आहे. गरीब परीस्थितीवर मात करून आपल्या समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे.आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शन प्राचार्य डॉ. नवनीतकुमार लांबा, व आई वडिलांना दिले. त्याच्या या यशाबद्दल प्रा. शिवाजी घरडे, प्रा. गणपत बुजाडे, प्रा. सुरज गोवर्धन, प्रा. किशोर शेंडे, प्रा. सुनील अलोणे, डॉ. दीपक तईकर,प्रा. रितेश रायकुंडलीया, डॉ. महेश गायधने, डॉ. पंकज मेश्राम, यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment