मांढळ येथील कारेमोरे भगिनींचा भाजपाकडून सत्कार वैद्यकीय क्षेत्रातील यशाने गावाचा मान उंचावला
स्वप्नील खानोरकर
मांढळ : ग्रामीण भागातील विद्यार्थिनी सातत्याने शिक्षणात नवे यश संपादन करत आहेत. याचाच आदर्श म्हणजे मांढळ येथील कारेमोरे भगिनी. भाजप मांढळ मंडळ वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षा डॉ. सौ. मिनाक्षीताई कारेमोरे व त्र्यंबक जी. कारेमोरे यांच्या सुपुत्री कु. अदिती व कु. अवंती कारेमोरे यांची यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल भाजप मांढळ मंडळाच्या वतीने रविवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भगवान गणेशाचे सुंदर चित्र भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थीनींनी चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. अदिती आणि अवंती यांचे यश केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करून समाजसेवेत मोठा वाटा उचलावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.मुलींच्या यशामागे आई-वडिलांचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन व शिस्तबद्ध अभ्यासाचा मोलाचा वाटा असल्याचेही गौरवोद्गार काढण्यात आले.या कार्यक्रमाला भाजप मांढळ मंडळ अध्यक्ष डॉ. विनोद भाऊ जुवार, जि. प. सर्कलप्रमुख स्वप्नील दादा राऊत, युवा मोर्चा अध्यक्ष वसंता ठाकरे, मंडळ महामंत्री मनोज मेश्राम तसेच धनपाल दादा लोहारे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment