जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील रात्रीचा सिंगल फेज विजपुरवठा सुरू ठेवा .
काँग्रेस पार्टीच्या वतीने एम एस ई बी ला दिले लेखी निवेदन.
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा बंद असल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.महावितरण च्या वतीने जवळपास सर्वच ग्रामीण भागात सिंगल फेज यंत्रणा बसवण्यात आली असून, ती सुरू सुद्धा होती मात्र बऱ्याच दिवसापासून जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील रात्रीचे सिंगल फेज लाईन बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रत्येक खेड्यापाड्यात लोक हे शेत वस्तीवर राहतात तर सध्या मका, सोयाबीन पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये पिकाची राखणी करण्यासाठी शेतात जागल करावे लागते. त्यामुळेचोरी आणि सर्पदंश यांसारख्या धोक्यांची भीती वाढली आहे.
मी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रशासनाला ठाम मागणी करतो की शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न लक्षात घेऊन तात्काळ रात्रीचा वीजपुरवठा सुरू करावा यासाठी जाफराबाद तालुका काँग्रेस च्या वतीने जाफराबाद येथील एम एस ई बी कार्यालयाला लेखी निवेदन देऊन रात्रीच्या सिंगल फेज लाईन सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
यावेळी जाफराबाद काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय बनकर, विशाल मुळे, ज्ञानेश्वर पाटील शिंदे ,तुळशीराम गाढवे ,पंकज पाटील लोखंडे, महेबुब पठाण ,जाहीर खान, शेख मजीत ,मिर्झा अमीन बॅग ,राम वाघमारे, पुंडलिक बनकर, सारंग मुळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
No comments:
Post a Comment