श्री लेमदेव पाटील महाविद्यालयात आरोग्य तपासणी



मांढळ :–येथील श्री लेमदेव पाटील महाविद्यालयात नुकतेच आरोग्य शिबिर पार पडले. शिबिरात डोळे तपासणी, हृदय तपासणी, रक्तदाब, वजन, युवक युवतींच्या समस्या निरोगी जीवनशैली याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य शिबिरात वरिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय कान्हव्हेंट मधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. श्री लेमदेव पाटील महाविद्यालय मांढळ, विक्रम पब्लिक स्कूल मांढळ व रोट्रक्ट क्लब यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. रफत खान यांचे मार्गदर्शनात आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये डॉ. श्रेया देशपांडे बालरोगतज्ञ डॉ.नहीद खान, स्त्रीरोग तज्ञ,डॉ. गोपाल अरोरा ए. बी.ओ. आय इन्स्टिट्यूट , अनुश्री साठवणे मयूर रोशनखेडे, यांनी आरोग्य तपासणी केली.

  शिबिराचे उद्घाटन डॉ पराग दाते रोटरी क्लब नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शब्बीर शाकीर माजी जिल्हाप्रमुख रोटरी क्लब डॉ. चक्रधर तितरमारे अध्यक्ष श्री चैतन्येश्वर शिक्षण मंडळ, प्राचार्य डॉ. नवनीत कुमार लांबा प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरामध्ये रोट्रॅक्ट क्लबची नवीन कार्यकारणी स्थापन करण्यात आली. यावर्षी अध्यक्ष म्हणून अल्फिया शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व सभासदांना शपथ देण्यात आली.  

     शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. नवनीत कुमार लांबा तर संचालन डॉ. स्मिता खरकाळे आभार प्रा. पंकज उईके यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी रोट्रक्ट सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment