युवांच्या उत्साहात मदनापूरात मनसेत पक्षप्रवेश
राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन नवे चेहरे पक्षात
स्वप्नील खानोरकर
पचखेडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाव ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. शुक्रवार दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी मदनापूर येथे मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारप्रेरणेने प्रेरित होऊन अनेक युवा कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष शेखरभाऊ दुंडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपाध्यक्ष व उमरेड विधानसभेचे महादेवजी आंबोने, तालुका अध्यक्ष शिवपाल फेंडर आणि तालुका सचिव विजुभाऊ कस्तुरे यांच्या उपस्थितीमुळे विशेष उत्साहाचे वातावरण होते.या वेळी शिवशंकर भगवानजी मेश्राम यांची उपशाखा अध्यक्षपदी, आशिष मते यांची शाखा अध्यक्षपदी, विजुभाऊ बडगे यांची सचिवपदी, तर जागेश्वर बांडबुचे यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.
तर युवा पंक्तीतून कुणाल मते, अथर्व गोंडाने, भूषण सपाटे, साहिल भगत, कार्तिक कडुकर, आकाश ठाकरे, सचिन मुळे यांनी जोशपूर्ण पक्षप्रवेश केला.पक्षप्रवेशावेळी झालेल्या घोषणाबाजीने मदनापूर गाव दणाणून गेले. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात घडणाऱ्या बदलांचे वारे लवकरच ग्रामीण भागातही जाणवतील असा ठाम विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या ऊर्जेने युवा मनसेत सामील होत असल्याने संघटनेला बळ मिळणार आहे.
No comments:
Post a Comment