श्री बा.ल.महाडीक विद्यालय नेवरी येथे पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
नेवरी प्रतिनिधी श्री मुकुंद सुकटे
नेवरी(ता.कडेगाव)येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.बा.ल. महाडीक विद्यालयांमध्ये शिक्षणाची गंगोत्री तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवून शिक्षणाद्वारे स्वावलंबनाचा पाया भक्कम करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. प्रमिला साळुंखे , मुख्याध्यापक श्री. एस, एच, पाटील व स्कूल कमिटी सदस्य श्री वसंत महाडीक यांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
माजी कौन्सलिंग सदस्य व मुख्याध्यापक श्री विलासराव महाडीक,श्री.साहेबराव महाडीक, श्री.राजेंद्र यादव,श्री.उत्तम देसाई,श्री.अरुण सूर्यवंशी,श्री.यशवंत महाडीक,श्री.सुखदेव महाडीक, मीनाक्षी महाडीक, रत्नप्रभा यादव,सिंधुताई महाडीक, श्री.शंकर महाडीक, श्री.सुभाष महाडीक, श्री. रामचंद्र महाडीक,श्री.अशोक महाडीक, श्री.प्रल्हाद महाडीक, श्री गिरीश कुलकर्णी न्यूज प्रतिनिधी श्री मुकुंद सुकटे श्री उद्धव महाडीक श्री सतीश ननवरे , श्री.संतोष महाडीक,श्री.अर्जुन महाडीक,सौ सुवर्णा महाडीक सौ नीलिमा महाडीक,सौ उज्वला महाडीक, सौ आशा महाडीक, सौ संजीवनी महाडीक, श्रीमती सिंधुताई महाडीक व आजी माजी रयत सेवक उपस्थित होते.
गावातील मुख्य रस्त्यावरून कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची फेरी काढण्यात आली.यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपरिक व महापुरुषांच्या वेशभूषा केली होती.मुला-मुलींनी टिपरीनृत्य पथक,झांज पथक,ढोल पथक,लेझीम,डीजे वाद्यांच्या समावेशात मिरवणूक गौरव कॉर्नर ते ग्रामपंचायत ते श्रीराम मंदिर पेठेतून शिवशक्ती चौकात आली शिवशक्ती चौकात झांज पथक लेझीम दांडिया विद्यार्थ्यांनी आपले खेळ प्रदर्शित केले तसेच शिवशक्ती चौकात श्री जनार्दन वसंत महाडिक यांनी कर्मवीर जयंती निमित्त सर्व विद्यार्थ्यांसाठी नाष्ट्याचे आयोजन केले होते .यावेळी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई, महात्मा जोतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्या वेशभूषा केल्या होत्या. मिरवणुकी नंतर विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षक शिक्षिका यांना माजी रयत सेवक व ग्रामस्थांच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली.यावेळी सर्व शिक्षक ग्रामस्थ शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment