मुकुंदराजस्वामी कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे जिल्हा रनिंग स्पर्धेत स्थान निश्चित.
कुही येथील क्रीडा संकुलनाच्या मैदानावर तालुका स्तरीय रनिंग स्पर्धा संपन्न.
कुही:–जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर च्या वतीने तालुकास्तरीय शालेय रनिंग स्पर्धेचे कुही येथील क्रीडा संकुलनाच्या मैदानावर नुकतेच आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा संयोजक दिनेश गुरुनुले यांच्या हस्ते घेण्यात आले. याप्रसंगी विनायक तितरमारे, वनदेव ठाकरे, मनोहर हारगुडे व तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेत पचखेडी (गां.) येथील मुकुंदराजस्वामी कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी 19 वर्षाखालील वयोगटात बाजी मारली. 100 मिटर मुले गटात सारंग चुधरी प्रथम तर सागर चाफले ने दुसरा क्रमांक मिळवीला. 100 मिटर मुली गटात मंजुषा भोयर ने प्रथम क्रमांक पटकावला. 200 मिटर मुली गटात वैष्णवी ऊके ने प्रथम तर मुले गटात अमर सोनकर ने दुसरा क्रमांक प्राप्त केला. या खेळाडूंचे जिल्हा स्पर्धेत स्थान निश्चित झाले असून ते तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत. विजयी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष अंबादास तितरमारे, संस्थासचिव तथा कृउबास सभापती मनोज तितरमारे, माजी जिल्हा परिषद सदस्या मेघा तितरमारे, प्रा. विशाल मनोहर, प्रा. धनराज मानकर, प्रा. आम्रपाली बनकर, प्रशांत तिजारे, प्रिती लुटे, प्रिया शेंडे आदीं शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment