जि.प.प्राथमिक शाळा नजिक चिंचोली येथे निरोप समारंभ व गुणगौरव सोहळा संपन्न
प्रतिनिधी.नामदेव सरोदे.
नजिक चिंचोली (ता.नेवासा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निरोप समारंभ व गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात कु. साक्षी लक्ष्मण जाधव (इस्रो सहलीसाठी सन २०२५-२६ निवड) व कु. अनुष्का कृष्णा चावरे (जिल्ह्यात द्वितीय क्रमांक) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच श्री. निवृत्ती कर्डिले सर, श्री. हरीचंद्र ठोंबरे सर, श्रीमती पल्लवी सायगावकर मॅडम, श्रीमती मनिषा सातपुते मॅडम, श्रीमती मनिषा कावरे मॅडम या सर्व निरोप मुर्ती यांना विद्यमान आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. भागचंद महाराज पाठक होते. प्रमुख उपस्थितीत सौंदळा सरपंच शरद अरगडे होते. यावेळी संदीप पाठक, अशोक लंघे, भागचंद चवारे, प्रदीप पाठक, भिमराव पाठक, गोवर्धन पाठक, संजय आढागळे, लखन जाधव, अर्जुन धाडगे, सर्व विद्यार्थी ,शिक्षक वृंद, मुख्याध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment