तळेगाव येथे पांदन रस्तावर वृक्षारोपण



तालुका प्रतिनिधी - उमेश गिरमकर

तळेगाव( शा.प) - निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावणे आवश्यक झाले आहे, यांची जनजागृती व्हावी तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने महसूल सप्ताह निमित्त मौजा रामदरा राज्य मार्ग २४३ ते दत्त मंदिर या पांदन रस्त्यावर आष्टी च्या तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.शेतकऱ्याना शेती करीता हक्काचा पांदन रस्ता महाराष्ट्र शासन मोहीमे अंतर्गत पांदन अतिक्रमण मुक्त करून नवीन रस्ता करण्यात आला.तळेगाव मौजा रामदरा राज्य मार्ग २४३ ते दत्त मंदिर या पांदन रस्त्यावरील अतिक्रमण मुक्त करून मुरूम व खडीकरण करत काम प्रगतीपथावर आहे.भविष्यात अतिक्रमण होऊ नये या उद्देशाने शासनातर्फे महसूल व वनविभाग अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येत आहे.या कार्यक्रमाला तलाठी जयसिंगपूरे पोलिस पाटील योगिता गाडगे ठेकेदार अक्षय पचारे शेतकरी दिलीप कडु तारेश बोडखे निळकंठ गाडगे मुकुंद मांडळे तसेच ग्रामस्थ चंद्रशेखर जोरे संपत पाचघरे प्रामुख्याने उपस्थित होते


No comments:

Post a Comment