आष्टी ते पारडी रोडनी करावी लागते कसरत
ग्रामीण प्रतिनिधी, उमेश गिरमकर बोटोणा
कांरजा तालुक्यातील पारडी गावापासून आष्टी परन्त रोडचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.परन्तु ऐन पावसाळ्यात संपूर्ण रोड चिखलमय झालेला आहे त्यामुळे मोटरसायकल चालवतानी खुप प्राण घातक कसरत करावी लागते अनेक व्यक्ती मोटरसायकल चालवतानी पडुन जखमी सुद्धा झालेले आहे.कारण ठेकेदार यांचे कडुन एक साईट रोडवर गिट्टी पसरवून ठेवण्यात आली तर एक साईट कच्च्या मुरूम टाकून ठेवला आहे.गिट्टी टाकुन ठेवली परन्तु त्यावर रोडवर रोलर सुद्धा फीरवल्या जात नाही त्यामुळे त्यावरुन वाहन चालवताना खुप त्रास सहन करावा लागतो तर दुसऱ्या बाजूला मुरूम टाकून असल्याने सुद्धा वाहन चालवताना त्रास सहन करावा लागतो रोड उकरून असल्याने बस सुद्धा येत नाही त्यामुळे शाळेकरी मुलांना सुद्धा शाळा कॉलेज ला जाताना त्रास सहन करावा लागतो.
No comments:
Post a Comment