पोटा-चनकापूर ग्रामपंचायत विभाजनाला शासनाची मंजुरी – विलास महल्ले यांच्या प्रयत्नांना यश



खापरखेडा: रितिक बन्सोड

पोटा-चनकापूर ग्रामपंचायतीच्या विभाजनाला अखेर महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री विलास महल्ले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला. ग्रामपंचायत प्रशासनाने विभाजनाचा प्रस्ताव मंजूर करून विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. त्यांनी शिफारसीसह तो शासनाकडे पाठविला; मात्र ग्रामविकास मंत्रालयात हा प्रस्ताव बराच काळ रखडला होता.

या पार्श्वभूमीवर, विलास महल्ले यांनी उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल केली. २८ जुलै रोजी शासनाने न्यायालयाला पोटा-चनकापूर विभाजनाची कार्यवाही सुरू असल्याचे कळविले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी अधिकृत आदेश जारी करण्यात आले.गाव व समाजाच्या विकासासाठी तत्पर असलेल्या विलास महल्ले यांच्या प्रयत्नांना नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment