स्काऊटर गाईडर उदबोधन व बिगनर्स कोर्स ची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी @विठ्ठल कत्ते ईसरूळ
देऊळगाव राजा - शिक्षण विभाग आणि बुलढाणा भारत स्काऊट गाईड कार्यालय जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील स्काऊटर व गाईडर यांचे उध्दोबन वर्ग व बिगिनर्स कोर्स ची एक दिवसीय कार्यशाळा देऊळगाव राजा देऊळगाव राजा हायस्कूल येथे दि.21/7/2025 सोमवारी संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा चे प्राचार्य श्री आर.बी. कोल्हे सर तर प्रमुख पाहुणे श्री मुसदवाले साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देऊळगाव राजा. तसेच सहाय्यक जिल्हा आयुक्त श्री आर.यू.शिंगणे सर जिल्हा स्काऊट संघटक श्री सुधाकर साखरे सर व जिल्हा गाईड संघटक
कु.कविता पवार मॅडम तसेच श्री सतिषकुमार पडूळगावकर प्रशिक्षण तज्ज्ञ उपस्थित होते.
कार्यशाळेत 35 स्काऊट व गाईडर यांची उपस्थिती होती. कार्यशाळेची सुरूवात स्काऊट व गाईड चळवळ चे जनक बेडेनपॉवेल यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. सुरूवातीला दया कर दान भक्ती का हमें प्रमात्मा देना या प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा आयुक्त श्री आर.यु.शिंगणे सर यांनी मार्मिक व विस्तृत विवेचन केले. स्काऊट व गाईड चळवळीचे चारीत्र्य ,शील, आरोग्य,बल,कौशल्य, सेवा या आधारस्तंभ वसलेली आहे. या चळवळीतून स्काऊट व गाईड यांचा सर्वांगिण विकास करावा. तसेच शिक्षकांनी अधिक सक्षम राहून प्रत्येक विद्यार्थीशी शिक्षकांनी समन्वय साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा.असे मत देऊळगाव राजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री मुसदवाले साहेब यांनी व्यक्त केले.
तसेच बुलढाणा जिल्हा संघटक गाईड कु कविता पवार यांनी स्काऊट गाईड चळवळीचे महत्त्व व गरज या विषयावर आपले मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आर.बी.कोल्हे सर यांनी स्काऊट व गाईड चळवळी मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. असे मत व्यक्त केले. तसेच कार्यशाळेच्या दुस-या सत्रात आदर्श स्काऊटर श्री सतिष कुमार पडूळकर सरांनी विविध प्रशिक्षणे, व विविध पुरस्कारांची माहिती दिली. त्याच बरोबर स्काऊट जिल्हा संघटक श्री सुधाकर साखरे सर यांनी ऑनलाईन युनिट नोंदणी, तसेच विविध व सविस्तर माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त प्रमाणपत्र वाटप करून स्काऊटर श्री सतिष कुमार पडूळकर सरांनी ए.ल.टी.प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री मुसदवाले साहेब यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच उत्कृष्ट स्काऊटर,लेखक, कवी, श्री बाबाराव डोईजड यांचाही यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री मुसदवाले साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श स्काऊटर व देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजाचे पर्यवेक्षक श्री प्रेमचंद राठोड सर यांनी केले. तर आभारप्रदर्शन श्री सुधाकर साखरे सर यांनी केले.या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी श्री..... सर व कु........मॅडम तसेच श्री गणेशजी क्षीरसागर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment