खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसा निमित्त रामधन कळंबे यांच्याकडून गौशाळेतील गायीना ढेप वाटप...



गौरी शंकराचा अभिषेक, महाआरती करून महाप्रसादाचे आयोजन.



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 



जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांच्या वतीने गौरीशंकर आश्रम गोंधनखेडा येथील गौशाळेतील गायीना ढेप व गुळाची वाटप करण्यात आली. त्याच बरोबर गौरी शंकर महादेवाचा अभिषेक, महाआरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर प.पू.महेशगिरी महाराज यांचेही पूजन करण्यात आले. त्याचबरोबर गौरी शंकर आश्रमाचे शिवाजी वरगणे, श्री. गाडेकर मामा, रमेश वरगणे. विठ्ठल गोरे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, काँग्रेस सुरेश गवळी, शिवसेना तालुका प्रमुख कुंडलिक मुठ्ठे, सरपंच विठ्ठल गोरे, शिवाजीराव गावंदे, रमेश धवलीया, गुड्डू मघाडे, राजू करवंदे,रघुनाथ पंडित, नितीन शिवणकर, गणेश बापू चव्हाण, प्रभाकर चव्हाण, बाबासाहेब जाधव, विष्णु जमधडे, विनोद खेडेकर, रामदास जाधव, विष्णू म्हस्के, हरीशचंद्र म्हस्के, कौतिकराव राऊत, पांडुरंग बोरसे, गफ्फर पठाण,  समाधान चव्हाण, अनिल शेजुळ,  गणेश गाडेकर, योगेश सवडे, रवी खरात, रमेश जाधव, बंडू भालके, गणेश गाडेकर, विलास भालके, सावता गोरे, लिंबा जाधव, सौरभ डोईफोडे, कैलास सुसर, कारभारी सवडे, अनिल सवडे, शुभम गोडसे, विठ्ठल जोशी, पमु पाचे, तुकाराम सोनसाळे, राजू चव्हाण विनोद चव्हाण, सुरेश राजभोज, कैलास फोलाने, कडूबा राऊत, मुन्ना बायस ,राजू वाघ, शंकर शेळके, उमेश कडाळे, गणेश गायकवाड, यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पवित्र श्रावण महिन्याच्या सुरवातीलाच गौसेवा करून गौरी शंकर महादेवाचा अभिषेक, महाआरती करून महाप्रसादाची संधी मिळाल्याने आनंद झाल्याचे रामधन कळंबे यांनी सांगितले.

One attachment

  • Scanned by Gmail


No comments:

Post a Comment