हुमणी अळी मुळे इसरूळ येथे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान
जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने कृषी विभाग व महसूल विभाग यांचे संयुक्त पंचनामे
तालुका प्रतिनिधी - विठ्ठल कत्ते
मौजे ईसरूळ गावातील शिवारामध्ये हुमनी अळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे तसेच इसरूळ येथील सोयाबीन पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे कृषी विभाग व महसूल विभाग यांच्यातर्फे पंचनामे आज रोजी सुरू झाले आहे
कृषी अधिकारी श्री विजय जोगदंडे महसूल विभागामार्फत ग्राम महसूल अधिकारी गोविंद चव्हाण व महसूल सेवक प्रभाकर इंगळे यांच्याद्वारे संयुक्त पंचनामे करणे सुरू आहे तरी शेतकऱ्यांना सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे पंचनामे करतेवेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत लक्ष्मण भुतेकर, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा काळे,सांडू भुतेकर रामेश्वर विनायक भुतेकर मंगरूळ येथील शेतकरी संदीप गवते उपस्थित होते
No comments:
Post a Comment