एक पाऊल स्वछतेकडे,देळेगव्हाण ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडी सह मेडिक्लोवर बॉटल वाटप

 



टेंभुर्णी प्रतिनिधी  विष्णु मगर 

आपले गाव स्वच्छ व सुंदर राहावे या उद्देशाने शासनाच्या स्वच्छ भारत मिशन तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत देळेगव्हाण ग्रामपंचायतिने अभिनव उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ वत्सलाबाई कापसे,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी 15 व्या वित्त आयोगातून देळेगव्हाण गावातील प्रत्येक घरांमध्ये ओला व सुका कचरा असा वेगवेगळा कचरा वर्गीकरण करण्यासाठी दोन कचरा कुंड्यासह पाणी शुद्धीकरण करण्यासाठी मेडिक्लोवर बॉटल चे वाटप करण्यात आले.

   देळेगव्हाण ग्रामपंचायतिने राबविलेली ही मोहीम आदर्शवत असून ती फक्त गाव ,तालुका ,जिल्हापूर्ती मर्यादित न राहता महाराष्ट्र राज्याला दिशा देणारी ठरणार आहे.त्यामुळे देळेगव्हाण गावातील ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी विल्हेवाट लावली जाणार आहे. त्याचबरोबर गावातील रोगराई दूर होऊन प्रत्येकाचे आरोग्य निरोगी राहायला मदत होणार आहे.

    या दोन्ही कचरा कुंड्याचे वाटप करताना  भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद पंडित,जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित,ग्रामविकास अधिकारी एस बी शिंदे,सरपंच सौ वत्सलाबाई कापसे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दिनकर पंडित,ग्रामपंचायत सदस्य डिंगबर वरशील, साईनाथ निलक,अजय गाढवे,सुनील बनकर,संतोष हिवाळे,पवन पंडित,ग्रामपंचायत कर्मचारी कैलास कापसे,राहुल वरशीळ ,अमोल वरशीळ तसेच एकनाथ बुरकुल, अशोक पंडित,राजू पंडित,राहुल वरशीळ,यांच्यासह गावकरी ,महिलांची उपस्थिती होती

देळेगव्हाण हे गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न सुरु असून गावातील रोगराई दूर करण्याचा मानस दूर करण्याचा ग्रामपंचायत चा मानस असून वाटप केलेल्या दोन वेगवेगळ्या कचराकुंड्यात ग्रामस्थांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून ग्रामपंचायतिला सहकार्य करावे .ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम गावात राबविण्यात येणार आहे .-सौ.वत्सलाबाई कापसेउपसरपंच देळेगव्हाण.

No comments:

Post a Comment