झेप फाउंडेशन व मातृभूमी सोशल फाउंडेशन तर्फे 'महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार’ गोपाळ कळसकर यांना जाहीर
गोपाळकुमार कळसकर@ प्रतिनिधी
भुसावळ : झेप फाउंडेशन व मातृभूमी सोशल फाउंडेशन ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी समाजकार्य, पत्रकारिता, शैक्षणिक, युवा उद्योजक, क्रीडा, साहित्य, कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणीजणांना महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. ‘पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे होते’ या तत्वावर झेप व मातृभूमी फाउंडेशन कार्य करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या हेतूने या संस्था कार्यरत आहे. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ व उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन गोपाळकुमार चांगदेव कळसकर (आयुध निर्माणी वरणगांव) यांची यंदाच्या महाराष्ट्र रत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्काराकरीता झेप व मातृभूमी सोशल फाउंडेशनतर्फे निवड करण्यात आली आहे. गोपाळकुमार कळसकर हे दैनिक अधिकारनामा, बाळकडू प्रतिनिधी असून दैनिक योजना दर्पण, सारथी महाराष्ट्राचा,दर्पण,महाराष्ट्र ग्रामीण न्युज, तेजोमय न्युज अशा विविध वृत्तपत्रांतून त्यांनी जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. ते झेप फाउंडेशन, पुणे या संस्थेचे जळगांव जिल्हा सचिव आहेत. या संस्थेच्या मार्फत रक्तदान शिबिर,गरीब विद्यार्थी व गरजूंना मोफत जीवनावश्यक साहित्य वाटप ,वृक्षारोपण,संविधान परीक्षा आयोजन अशा विविध उपक्रमांचे त्यांनी उत्स्फूर्त आयोजन व सहभाग नोंदवला आहे.
येत्या १३ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत ,एस एम जोशी फाउंडेशन व पत्रकार भवन शेजारी निवारा हॉल, नवी पेठ,पुणे येथे सदर पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. सदर कार्यक्रमात मा.निलेश लंके ( खासदार), मा. ज्योती कदम (उपजिल्हाधिकारी, पुणे), मा राहुल आवारे (सहा. आयुक्त,स्वारगेट पुणे), सुरेखा भंगे (सहा.आयुक्त,पुणे मनपा), मोहन भदाने(उपविभागीय अभियंता,मुठा कालवा व पाटबंधारे विभाग ), शरद झिने ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक), साळुंखे साहेब ,कामगार अधिकारी,मा.गोपाळ खंदारे,रुपचंद फुलझेले आदी अतिथी उपस्थित असणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थीना सन्मानपत्र, मानाचा फेटा ट्रोफी व मेडल देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे,असे झेप फाउंडेशनचे संस्थापक कांताभाऊ राठोड व मातृभूमी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अशोक पाटील यांनी कळवले आहे.गोपाळ कळसकर यांचे सदर पुरस्कार निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment