केंब्रिज युनिव्हर्सिटीकडून राहुल रमेश बोरा यांना डॉक्टरेट पदवी | गोव्यातील आंतरराष्ट्रीय सन्मान सोहळ्यात मानाचा गौरव..!



पुणे जिल्हा प्रतिनिधी–अविनाश घोगरे


 शिरूरच्या सुपुत्राचा जागतिक पातळीवर अभिमानास्पद सन्मान होत, राहूल रमेश बोरा यांना लंडन येथील प्रतिष्ठित केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या मानव संसाधन विभागाकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. ही पदवी त्यांना १४ जून २०२५ रोजी गोव्यात पार पडलेल्या “इंटरनॅशनल कॉन्फरमेन्ट अवॉर्ड सेरेमनी २०२५”या भव्य समारंभात प्रदान करण्यात आली.

या गौरवपूर्ण सोहळ्यात गोव्याचे माजी मुख्यमंत्री  दिगंबर कामत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय डॉ. राजेश सोनार, डॉ. राजेश जाधव, डॉ. नर्मदा पाठीरंगे, डॉ. मनू सिंग, डॉ. बालाजी सिंग, डॉ. दिव्यांषु पावल, डॉ. वैभवी पाटील, डॉ. सेबीस्टन मेंडिस यांसारख्या देश-विदेशातील मान्यवर तज्ञांचीही उपस्थिती कार्यक्रमास लाभली.

राहुल बोरा यांनी मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या बहुमोल कार्याची दखल घेऊन त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यांच्या दूरदृष्टी, व्यावसायिक कार्यकौशल्य आणि नेतृत्व क्षमतेमुळे त्यांनी अनेक संघटनांच्या यशस्वी वाटचालीस हातभार लावला आहे. त्यांच्या कामामुळे मानवी संसाधन क्षेत्रात नवे मापदंड निर्माण झाले आहेत.या सन्मानाने शिरूर शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या डॉक्टरेट पदवीसह श्री. राहुल रमेश बोरा यांनी केवळ वैयक्तिक यश संपादन केले नसून, नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून उभे राहत मानव संसाधन व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेली आहे.

 “संघटनांचा पाया मजबूत करणारे खरे शिल्पकार – राहुल बोरा!” असा गौरववचनांनी त्यांचा गौरव करण्यात आला.ही डॉक्टरेट ही केवळ शैक्षणिक गौरव नव्हे, तर नेतृत्व, मूल्याधिष्ठित व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकी या सर्व बाबींचा सन्मान आहे.सोहळ्याचे क्षण, पुरस्काराचे मानचिन्ह आणि राहुल बोरा यांचा उत्साह, उपस्थित मान्यवरांची कौतुकमय भाषणे – या सर्वांनी हा सोहळा संस्मरणीय केला. सम्पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट – डॉ. राहुल रमेश बोरा यांचे हार्दिक अभिनंदन.!

No comments:

Post a Comment