वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करावे: प्राचार्य दत्तात्रय जाधव
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साधना विद्यालयात वृक्षारोपण
हवेली प्रतिनिधी अनिल वाव्हळ
“मानवी जीवनातील वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करावे, आपल्या वसुंधरेला हरित व प्रदूषणमुक्त करून संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे”, असे मत विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी मांडले. ५ जून २०२५ रोजी साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज, हडपसर येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी व वसुंधरेचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. तसेच उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, पर्यवेक्षिका साधना सुर्वे, पर्यवेक्षक अजय धनवडे, ज्युनियर कॉलेज प्रमुख डॉ.धनाजी सावंत,विजय सोनवणे,गजेंद्र शिंदे,
राष्ट्रीय हरित सेनेचे व पर्यावरण विभागाचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यावेळी विद्यालयातील शिक्षक कोंडीबा टेंगले, संदीप पिसे, सिद्धेश्वर काशिद, सुषमा कारंडे व राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment