राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महेर संस्थेत अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप..!
मनसे पदाधिकाऱ्यांकडून “सेवेचा सण”; शिरूरमध्ये सामाजिक जाणीवतेचे उत्तम उदाहरण
शिरूर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक व करारी नेतृत्व असलेले राजसाहेब ठाकरे यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुक्यात एक आगळावेगळा आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. "वाढदिवस साजरा नाही, सेवा साजरी करा", या भावनेतून वढू येथील 'महेर संस्था' येथे वास्तव्यास असलेल्या निराधार आणि अनाथ बालकांसाठी शालेय साहित्याचे भव्य वाटप करण्यात आले.या उपक्रमात मुलांना शालेय बॅग, वह्या, पेन, पेन्सिली, कॅप्स आणि फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे त्या निरागस चेहऱ्यांवर हास्य उमटले आणि उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले.
या प्रसंगी "आम्ही शिरूरकर फाउंडेशन" चे अध्यक्ष रविंद्र बापू सानप, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसे शिरूर शहराध्यक्ष आदित्य मैड, माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, शहर सचिव रवी लेंडे आणि प्रसिद्ध फुलांचे व्यापारी गोपीनाथ पठारे यांनी विशेष सहभाग घेतला.
सर्व मान्यवरांनी राज ठाकरे यांच्या सामाजिक जाणिवेचे, त्यांच्या नेतृत्वगुणांचे आणि प्रेरणादायी कार्यपद्धतीचे मनःपूर्वक स्मरण करून, त्यांच्या आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या“राज ठाकरे हे केवळ एक राजकीय नेते नसून, त्यांचा दृष्टिकोन हा सामाजिक जाणिवेने परिपूर्ण आहे. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आम्हीही समाजासाठी काहीतरी देणं लागतं हे मनापासून समजून घेतलं,” असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.या उपक्रमातून एक सामाजिक संदेश देण्यात आला – वाढदिवस हा केवळ आनंदाचा नव्हे, तर सेवा देण्याचा आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसोबत साजरा करण्याचा दिवस असावा.
शिरूरमधून सुरू झालेला हा सकारात्मक उपक्रम इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरावा. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सामाजिक सेवेकडे कल वाढत असून, अशा कृतींमुळे समाजाच्या मनात नवीन विश्वास निर्माण होतो
No comments:
Post a Comment