हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अमूल्य ठेवा जपणारा अवलिया!



दिवा शहरातील विलास मुळम यांची प्रेरणादायी साधना


प्रतिनिधि अरविंद कोठारी

काही लोक बाळासाहेब ठाकरे यांची जळजळीत भाषणं साठवून ठेवतात, काही 'सामना'च्या जुन्या आवृत्त्या जपतात... पण दिवा शहरात एक अवलिया आहे, ज्याने केवळ साठवणच केली नाही, तर बाळासाहेबांच्या विचारांना आत्मसात करत त्यातून प्रेरित होऊन एक वेगळं कार्य उभं केलं आहे.या व्यक्तीचं नाव आहे श्री. विलास रामचंद्र मुळम. त्यांनी गेल्या दोन वर्षांत २०० हून अधिक ब्लॉग्स बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित लिहिले आहेत एक प्रकारचं ज्वलंत विचारांचं लेखनदालन ! बाळासाहेबांच्या जीवनचरित्र ग्रंथांची त्यांनी फक्त संग्रह नाही, तर त्यांच्या प्रत्येक पानामागील विचारांची अनुभूती घेतली आहे.

२६ जून २०२५ रोजी त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण उगवला शिवसेना भवन, मुंबई येथे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सल्लागार श्री. हर्षलजी प्रधान यांच्या शुभहस्ते, त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रग्रंथांची अधिकृत प्रत प्रदान करण्यात आली.या दिवशी, श्री. मुळम यांनी आपल्या राहत्या घरी या ग्रंथसंग्रहाची श्रद्धेने पूजा केली आणि दिवा शहरातील शिवसैनिकांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला.बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवणारा हा शिवसैनिक खरंच प्रेरणास्थान ठरतो आहे.

No comments:

Post a Comment