खरीप तयारीच्या ऐरणीवर कृषी विभाग लिपिकांचा लेखणी बंद आंदोलन



प्रविण भोंदे  प्रतिनिधी 

भंडारा : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना पुणे यांच्या वतीने राज्यातील कृषी विभागातील लिपिक स्वर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन केले आहे भंडाऱ्यात सुद्धा कृषी विभाग कार्यालयासमोर लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे विविध मागण्यांसंदर्भात शासन व कृषी आयुतालय स्तरावर निवेदने दिली. मात्र, मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. कर्मचार्‍यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. सुधारित आकृतिबंधामध्ये लिपिक संवर्गीय अधिकारी कर्मचार्‍यांचा आकृतिबंध आयुक्तालय ते क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील कोणतेही पद कमी न करता संघटनेने सुचवलेल्या किफायतशीर व आर्थिक बचतीच्या प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात यावी.

लिपिक संवर्गातील पदोन्नती स्तर कमी करण्यासाठी सुधारित आकृतिबंधामध्ये सहाय्यक अधीक्षक पद सुधारित मागणीनुसार कक्ष अधिकारी गट ब कनिष्ठ या पदांमध्ये समाविष्ट होण्याबाबत व पदनामात बदल करण्यात मान्यता द्यावी, लिपिक संवर्गीय अधिकार्‍याचे सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करावे, लिपिक संवर्गीय प्रति नियुक्तीची पदे चिन्हांकित होऊन त्यास मान्यता देण्यात यावी. वरिष्ठ लिपिक पदे 100 टक्के पदोन्नतीने भरण्याबाबत सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात यावा, सहाय्यक प्रशासन अधिकारी हे पद 75 टक्के पदोन्नतीने व 25 टक्के सरळ सेवेने भरण्याबाबत सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी शासनदरबारी निवेदने दिले. आंदोलनही केले. परंतु अद्याप शासनाने याबाबत निर्णय घेतला नसल्याच्या निषेधार्थ कृषी कर्मचारी संघटनेने दि. 2 ते 4 जून पासून लेखनी बंद आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने 5 जून पासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

या आंदोलनात राज्य कृषी विभाग लिपिक वर्गीय संघटनेचे पदाधिकारी योगेश लेदे, दिलीप श्रीरंग, सुवर्णा डगवार, तानेश्वर शेंडे, देवेंद्र धुर्वे, धीरज हावरे पुरुषोत्तम देशमुख, नरेंद्र खाटीक, दीक्षा बांते, सुभाष भुरे, दीपक बावनकुळे, अतुल दोनोडे व अन्य कर्मचारी पदाधिकारी उपस्थित झाले

No comments:

Post a Comment