कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड च्या निवडणुकीत भाजप प्रणित वसंतराव नाईक शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

 



बाळासाहेब पवार प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेडच्या 18 संचालक पदासाठी 31 मे 2025 रोजी मतदान झाले. त्यानंतर लगेचच मतमोजणी झाली. या मतमोजणी मध्ये वसंतराव नाईक शेतकरी विकास पॅनलच्या 18 पैकी 11 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. उमरखेड तालुक्यामध्ये भाजपची सत्ता आली तेव्हापासून उमरखेड तालुक्यातील ही कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिलीच निवडणूक भाजपाने आपल्या मित्र पक्षासोबत लढविली व निवडणूक जिंकली ही निवडणूक माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा,आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वसंतराव नाईक शेतकरी विकास पॅनलने निवडणूक जिंकली आहे.

 या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा गट, सत्यशोधक पॅनलला सोबत घेऊन वसंतराव नाईक शेतकरी विकास पॅनल निर्माण केले या पॅनलचे कृष्णा पाटील देवसरकर,शिवराम कदम,गजानन गाडेकर, प्रकाश नरवाडे,चंद्रकलाबाई इंगळे,श्रीपाल आडे,गजानन देवसरकर,विवेक कन्नावार, राधेश्याम भट्टड, भीमराव चंद्रवंशी,विश्वास कांबळे, व काँग्रेस पार्टी, शिवसेना (उभाठा )शिवसेना (शिंदे.) गट यांनी एकत्र येऊन शेतकरी सहकार विकास आघाडी निर्माण केली व शेतकरी सहकारी विकास आघाडीच्या 18 पैकी 7 उमेदवारांचा विजय झाला. या पॅनलचे प्रवीण पाटील मिरासे,कैलास मोरे, सचिन देवसरकर, दैवशाली वानखेडे, गजानन सोळंके,राजेश कवाने, मोहम्मद रहिमोदिन,हे उमेदवार विजयी झाले.

 

No comments:

Post a Comment