जळगांव जिल्हा चर्मकार संघाची नवीन कार्यकारिणी निवड व सेवानिवृत्तांचा सत्कार संपन्न
तालुका प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर
भुसावळ : जळगांव येथे शनिवार दिनांक ७ जून रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत जळगाव जिल्हा चर्मकार संघाची सहविचार सभा पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे सर, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार साहेब, चर्मकार संस्थांचे अध्यक्ष वसंतराव नेटके, काशीनाथ इंगळे, खंडू पवार, संजय भटकर सर ,सौ.खामकर मॅडम इ.प्रमुख अतिथी व मोठ्या संख्येने समाज बंधू व भागिनी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सभा संपन्न झाली. सभेच्या सुरवातीस प्रमुख अतिथींच्या हस्ते जगतगुरु संत रविदास महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या वेळेस प्रमुख अतिथींचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व संत रविदास यांची प्रतिमा देऊन करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त झालेले व आदर्श समाजसेवा पुरस्कार प्राप्त समाज बंधूचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी सत्कारमूर्ती सतीश शिंदे , शिवराज कळसकर, निवृत्ती सूर्यवंशी , संजय भारुळे, नारायण तायडे, रमेश भोळे, प्रकाश रोजतकर, कैलास वाघ, बाळकृष्ण खिरोळे, रतीराम सावकारे,आदींचा सत्कार करण्यात आला. या वेळेस नवीन जिल्हा तसेच तालुका कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाचे जिल्हा अध्यक्षपदी ॲड .अर्जुन भारुळे,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.राजेश वाडेकर सर, जिल्हा सचिव प्रा.धनराज भारुडे, जिल्हा सह सचिव संदीप ठोसर, जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार साहेब, जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे , जिल्हा युवा संघटक शिवराज कळसकर, राज्य कार्यकारिणी सदस्य पदी संजय भटकर सर, खान्देश विभागीय अध्यक्ष मनोजभाऊ सोनवणे, जळगाव महानगर अध्यक्ष कमलाकर ठोसर, महानगर कार्याध्यक्ष पंकज तायडे, उपाध्यक्ष प्रा.संदीप शेकोकार, उपाध्यक्ष यशवंत वानखेडे, सचिव पंकज भारुळे, प्रसिद्धी प्रमुख लोकेश भारुडे, महानगर युवा संघटन योगेश वाडीले, तर जळगाव तालुका अध्यक्ष रवींद्र नेटके, सचिव ज्ञानेश्वर शेकोकार , जळगाव तालुका उपाध्यक्ष सिताराम राखुंडे ,भुसावळ तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर, बोदवड तालुका अध्यक्ष अनंत निंबाळकर, चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सोनवणे, जामनेर तालुकाध्यक्ष अरुण सावकारे, सचिव किरण सुरवाडे आदींची निवड करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय खामकर यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून जोमाने समाज संघटित करून समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनराज भारुडे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन दांडगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे,ॲड.अर्जुन भारुळे,पंकज तायडे, शिवदास कळसकर, काशीनाथ इंगळे, पंकज भारुळे, योगेश वानखेडे,लोकेश भारुळे, कमलाकर ठोसर, आदींनी परिश्रम घेतले.यावेळेस चर्मकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment