बुध्दीष्ट इंटरनॅशनल नेटवर्कद्वारा आयुध निर्माणी वरणगांव येथे कार्यशाळेतून प्रबोधन



   प्रतिनिधी  - गोपाळ कळसकर

भुसावळ : आयुध निर्माणी वरणगांव येथील सार्वजनिक बौद्ध विहारात बुध्दीष्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून नुकताच तथागत भगवान बुध्दांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिन राज्य प्रचारक  पंचशिला मोहोळ तर उद्घाटक म्हणून दक्षता व विधी समिती सदस्य, भुसावळ कोर्ट येथील संगिता भामरे लाभल्या. 

यावेळी कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून विशाखा पाटील, मंडळाधिकारी, मुक्ताईनगर होत्या. कार्यक्रमात कुसुमताई गायकवाड, शिलांबरीताई जमदाडे, साक्षी खरे, बि. डी. महाले, शुध्दोधन खंडारे, उदयभाऊ सपकाळे यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. गौतम बुद्धांचे तत्वज्ञान ही मानवी जीवनाच्या उत्थानाची गुरुकिल्ली आहे,बुद्धांची विचारसरणी प्रत्येकाने अनुसरावी असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले. कार्यक्रमात मुक्ताईनगर, यावल, रावेर, जामनेर, जळगाव, तसेच भुसावळ तालुक्यातील तळवेल, टहाकळी, फुलगाव, वेल्हाळा, चिखली, मेहून, इ. खेड्यातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश सोनवणे, अजय खंडारे, विकास सुरवाडे, विलास चिकने, आशिष वारके, संजय भालेराव यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी संयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment