देशासाठी सर्वोच्च बलिदान…



(देगलूर):

आपल्या देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र व सध्या देगलूर शहरातील जिया कॉलनीत राहणारे जवान सचिन वणजे यांना काश्मीरमधील श्रीनगर येथे ड्युटीवर असताना झालेल्या अपघातात वीरमरण आले आहे.

मंगळवारी (ता. ६) सकाळी साडेआठच्या सुमारास ड्युटीवर असताना त्यांचे वाहन दरीत कोसळले व हा दुर्दैवी अपघात घडला.सचिन हे गेल्या तीन वर्षांपासून भारतीय सैन्यात रामबाण, श्रीनगर येथे वाहनचालक म्हणून कार्यरत होते.त्यांचे पार्थिव बुधवारी (ता. ७) सायंकाळी देगलूर येथे आणले जाईल व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.सचिन यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी मधुरा व आठ महिन्यांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे.शहीद जवान सचिन वणजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


No comments:

Post a Comment