राजे छत्रपती कला महाविद्यालया मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

  


धामणगाव बढे प्रतिनिधी

      राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बढे येथे महाविद्यालायाच्या ग्रंथालयाच्या वतीने १४ एप्रिल २०२३ ला डॉ.बाबासाहेब जयंती उत्साहाने साजरी करण्यात आलीग्रंथपाल डॉस्वप्नील दांदडे यांनी प्राचार्य डॉअविनाश मेश्राम यांचे मार्गदर्शना मध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

      कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभागाचे डॉनितीन जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभागाचे प्रमुख डॉगजानन वानखडे मराठी विभाग प्रमुख डॉगोविंद गायकीवइंग्रजी विभागाचे प्रमुख प्राशशिकांत सिरसाट हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवराचे हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आलीतद्नंतर उपस्थित पाहुण्यांचा स्वागत सत्कार करण्यात आलाप्रस्ताविकेतून डॉ. स्वप्नील दांदडे यांनी डॉबाबासाहेबाचे शैक्षणिक व सामाजिक विचार हि काळाची गरज म्हणून या कार्यक्रमांच विशेष आयोजन केल असल्याच मत व्यक्त केलेडॉवानखडे यांनी बाबा साहेबांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रा मध्ये सर्व समाजातील जनते करिता प्रयत्न करून त्याना न्याय देण्याच कार्य केल्याच मत व्यक्त करतानाच बाबासाहेबांची विद्यार्थी दशा व आजची विद्यार्थी दशा यावर प्रकाश टाकलातर डॉगायकी यांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर प्रकाश टाकताना सध्यपरीस्थिती मध्ये घटनेची अंमलबजावणी किती महत्वाची आहे हे पटवून दिलेप्रासिरसाट यांनी फुले शाहू आंबेडकर वछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची सांगड घालून देत असतांना त्यांच्या विचारांची जोपासना करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

      महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुवैष्णवी मोदे हिने देखील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत सादर करताना बाबा साहेबांच्या शैक्षणिक विचार व भावी पिढी कडून त्याना असलेल्या अपेक्षा वर सखोल विचार करण्याचे आवाहन केलेआपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉनितीन जाधव यांनी संविधानावर विशेष प्रकाश टाकून उपस्थिताना आपल्या हक्काची जाणीव करून दिलीमान्यवरांच्या मार्गदर्शना नंतर बीप्रथम ची विद्यार्थिनी कुस्नेहल हुडेकर हि बीप्रथम सत्र मध्ये महाविद्यालयातून प्रथम आल्या बद्दल तिचा सत्कार करण्यात आलाकुस्नेहल हिनेच कार्यक्रमा करिता व सत्कारा करीता उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

      कार्यक्रमाला डॉशाहेदा नसरीन डॉमहादेव रिठेप्रादीपक लाहासे व विद्यार्थी उपस्थित उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment