ई-पीक पाहणी मुदतवाढ

 


    खामगाव: रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी करण्यासाठी राज्यशासनाने १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे आतापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांची ई- पीक पाहणी करण्याचे आदेश काढले होते. 

    त्यानुसार रब्बी हंगामातील पिकांची ३१ जानेवारीपर्यंत ई-पीक पाहणी करून याबाबत संबंधित अॅपवर नोंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. शेतकऱ्यांनाच ही नोंदणी करायची आहे. ही नोंदणी करताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या व इतर तांत्रिक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला. यामुळे बहुतांश शेतकरी मुदतीच्या आता ई-पीक पाहणी करू शकले नाहीत, त्यामुळे ई-पीक पाहणीस आता १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मुदतवाढीचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी मुदतवाढीच्या वाढीव तारखेचा लाभ घ्यावा, असे आव्हानही केले आते

No comments:

Post a Comment